विठू ची पायरी
जिविचा विसावा
आनंद मिळावा
जन्मभरी
क्षणिक विसावा
चरणासी देवा
अंतरीचा धावा
सांगू पाहे
भक्तीची ती रीत
नाही उमगली
उमर संपली
पांडुरंगा
तुझ्या पायरीशी
मिळू दे विसावा
जिविच्या जिवा
विठुराया
नाही मी रे संत
ना वाचले ग्रंथ
वारकरी पंथ
तोच माझा
पंढरी निवास
कधी नाही केला
नामात धरिला
पांडुरंग
चंद्रभागे मधे
नाही केले स्नान
पांडुरंग ध्यान
मनी वसे
– रचना : सौ.अर्चना मायदेव. ऑस्ट्रेलिया
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ +919869484800
वा! छान, कवितेत आपलेपणा वाटला…..
खुप सुंदर कविता 👌👌👌