Home साहित्य क्षण जगण्याचे !

क्षण जगण्याचे !

0

मस्त मोकळे, सुहास्यवदने, आनंदाने जगा,
जन्मापासून विणलेला हो, मृत्यूचा धागा,
मनासारखे कपडे घाला
मॅचींगला ना उगाच थारा,
आवडले ते घाला, विहरा, घ्या पिउन वारा,

झणझणीत ठेचा अन भाकर,
गुळाची पोळी, गाईचे तूप वर, मिरची-
भजीनी, भरीत भाकर,
पोट पूजाही करा,

फिरून यावे मस्त सकाळी,
पोहे-रस्सा करा न्याहारी,
बटाटे-वडे गरमच खाऊन,
ताक भात भूक धरा,

खावी खिचडी घालून तडका,
सोबत पापड चुरा नेमका,
मुळा नी कांदा, चटणी, छुंदा,
लाड भुकेचे करा,

कधी पुरणपोळी नी पक्वान्न,
कोबी-बटाटा भाजी, सुग्रान्न,
कुरडया, पापड, चटण्या सोबत,
ताक, कढी सावरा,

जसे चिंतले, मनात सारे,
आनंदाने करून घ्या रे,
मित्र बोलवा, जिवलग प्यारे,
क्षण साजरा करा..!!!

हेमंत भिडे

– रचना : हेमंत भिडे. जळगाव
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version