Wednesday, February 5, 2025
Homeसाहित्यक्षण निवांत सांजेची

क्षण निवांत सांजेची

अष्टाक्षरी काव्य रचना

क्षण निवांत सांजेची
होई शांत सांजवेळ
शितलता जीवनात
परिवारा घाली मेळ |१|

निशिकांत सांज होता
भरे चांदण्यांची शाळा
आई घेई मांडीवर
जोजवते तान्ह्या बाळा |२|

अंगणात वृंदावनी
समईच्या दिव्य ज्योती
विजयात तमावर
नभी चमकती मोती‌ |३|

आजी घेई वदवून
रामरक्षा पठणास
स्तोत्र निरांजन घेता
नित्य बसवी ध्यानास |४|

संस्कारांची मांदियाळी
शिकवती आजी आजा
भासे रातराणी गंध
कान्हा वाजवितो बाजा |५|

घरा येई घरपण
नांदे सौख्याचे गोकुळ
पुष्प उधळीत येई
भासे मोहक बकुळ |६|

शोभा कोठावदे

– रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी