Monday, September 15, 2025
Homeसाहित्यक्षण हे विराहाचे...

क्षण हे विराहाचे…

कावरले, बावरले, तुजविण मन माझे… विरहाने ।
बोल सखे, आज असा, काय गुन्हा मज झाला ।।

बंध नवे, प्रेमाचे, सारे तो तोडून गेला ।
छंद तुझ्या, मिलनाचा, तनमन जाळून गेला ||ध्रु.||

रूप तुझे, नयन तुझे, अन्य दिसे ना काही ।
भास तुझे, असण्याचे, होती कळे ना काही ।।

धावत ये, मजपाशी, खेळू नको या जीवाशी ।
झुरते आता, मन माझे, जवळी ये ना जराशी ।।

आठव ते, क्षण सारे, साठवले डोळ्यांनी…..||१||

घे ना जरा, मजलाही, समजूनि तू प्रेमाने ।
मिळूनी आता, संगतिने, प्रेमाचे गाऊ गाणे ।।

सोड आता, रुसवा तुझा, जुळवू एकपणानी ।
गोड असे, नाते हे, फुलवूया दोघांनी ।।

ध्यास पुन्हा, मिलनाचा, घेऊ एकमतानी…..||२||

आमोद पाटील

– रचना : आमोद अ. पाटील

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

सुबोध शशिकांत महाबळे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
Prashant Thorat GURUKRUPA on असे ही होऊ शकते !
CHANDRASHEKHAR PRABHAKAR KASAR on हलकं फुलकं
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on अमेरिकन भारतीयांनो “रजा” घ्या !
यश चंद्रकांत करकरे on हव्यात अशा शाळा, असे शिक्षक !
Shashikant Oak on व्यंग कथा
सौ. सुनीता नितीन फडणीस on व्यंग कथा