स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा केवळ प्राचीनच नव्हे तर समकालीन इतिहासाचाही दांडगा अभ्यास होता. त्यांचा इतिहासाचा अभ्यास सदाहरित होता. त्यांनी भारताच्या इतिहासावर लिहिलेली सर्व पुस्तके आणि विशेषत: ७५ व्या वर्षी लिहिलेले “सहा सोनेरी पाने” हे पुस्तक आपण अवश्य वाचलेच पाहिजे, असे आग्रही प्रतिपादन प्रा डॉ अशोक मोडक यांनी केले.
नवी मुंबईतील सावरकर विचार मंच आणि कवी कुसुमाग्रज वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने प्रा डॉ अशोक मोडक यांचे काल ‘सावरकरांचा इतिहास विषयक दृष्टिकोन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी मोडक सर बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, सावरकर सामान्य माणूस नव्हते. ते हिंदुत्व निष्ठ होतेच पण कुटिंन्हो हे त्यांचे मित्र होते, ज्यांनी “१८५७ चे स्वातंत्र्य समर” या पुस्तकाचे हस्त लिखित जपून ठेवल्यानेच पुढे हे पुस्तक प्रसिद्ध होऊ शकले.
भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी केवळ इंग्रजांच्याच नव्हे तर मोघलांच्या ही जोखडातून मुक्त झाला या कडे लक्ष वेधून त्यांनी नाटकी, नकली इतिहास लिहिणार्यांचे दिवस संपुष्टात आले आहेत, असे ठणकावून सांगितले.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना, माजी मंत्री, आमदार श्री गणेश नाईक म्हणाले की, जे त्याचे सद्गुगुणच तेव्हढे सांगितल्या जातात दुर्गुण नाही. त्यामुळेच आपण भारताचा खरा इतिहास समजून घेणे गरजेचे आहे.सावरकर विचार मंच चे प्रमुख संतोष कानडे हे ११ मार्च रोजी नवी मुंबईत आयोजित करणार असलेल्या राष्ट्रीय सावरकर सम्मेलनास आपले पूर्ण सहकार्य राहील, अशी ग्वाही देत त्यांनी कानडे करीत असलेल्या सत्कार्याबद्दल त्यांचा सत्कार केला.
प्रास्ताविक सावरकर विचार मंच, नवी मुंबईचे प्रमुख संतोष कानडे यांनी केले. सावरकर विचार मंचाची माहिती देताना त्यांनी ११ मार्च रोजी वाशी येथे राष्ट्रीय सावरकर सम्मेलन घेणार असल्याचे जाहीर केले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. मुक्ता पाटील यांनी जयो स्तूते हे जय गान सादर केले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन वैष्णवी कातारे यांनी केले.
या कार्यक्रमास कवी कुसुमाग्रज वाचनालयाचे अध्यक्ष श्री प्रवीण पाटील, प्रा वर्षा भोसले, ‘न्यूज स्टोरी टुडे’ चे संपादक देवेंद्र भुजबळ यांच्यासह अनेक मान्यवर आणि मोठ्या संख्येने सावरकर प्रेमी उपस्थित होते.

– लेखन : टीम एनएसटी. ☎️ 9869484800
सावरकरांचं सहा सोनेरी पाने हे लेखन खरा इतिहास कसा असू शकतो हे स्पष्ट होत नाही वास्तविकता हे जे काही लिखाण आहे ते इतिहासच्या व्याख्येत मुळात बसतच नाही. असो वाचणाऱ्यांनी ते वाचावं पण त्यास खरा इतिहास असं विषेशन लावणेच योग्य.