कल्याण डोंबिवली महानगरपालिका आणि ठाणे जिल्हा क्रीडा अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नुकत्याच आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय खो खो स्पर्धेत कल्याण येथील नूतन ज्ञानमंदिर शाळेचे १७ वर्षाखालील गटातून मुले व मुली प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले. तर १४ वर्षाखालील गटातून मुली द्वितीय क्रमांकाच्या, मुले तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले.
खो खो च्या स्पर्धांमध्ये या शाळेतील खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत जणू विजयाचा चौकार मारला आहे.
या यशामध्ये शाळेच्या मुख्याध्यापिका सौ .मिनाक्षी गागरे मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. बबन निकूम सर आणि पर्यवेक्षक श्री. विजय भामरे सर तसेच विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन करणारे गुणवंत प्रशिक्षक आदरणीय श्री. प्रदीप बाळकृष्ण महापदी सर आणि श्री.अभिषेक शरद इडेकर सर, मार्गदर्शक क्रीडा प्रमुख श्री.गवळे सर, श्री.दळे सर आणि सर्व गुणवंत खेळाडूंचे हार्दिक अभिनंदन आणि विभागस्तरावर खेळण्यासाठी खूप खूप शुभेच्छा.

– लेखन : आस. कल्याण
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800