स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण देणाऱ्या अमरावतीच्या मिशन आयएएस संस्थेच्या सदस्या श्रीमती पल्लवी उमरे यांच्या “गंधाळलेल्या स्वप्नकोषी” या पुस्तकाला अकोला येथील, अंकुर साहित्य संघाचा ललित या वाङ्मय प्रकारातील प्रतिष्ठेचा राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त झाला आहे. या पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून पुस्तके आली होती. त्यातून श्रीमती पल्लवी उमरे यांच्या पुस्तकाची निवड करण्यात आली. धुळे येथे होणाऱ्या साठाव्या राज्यस्तरीय अंकुर साहित्य संमेलनात या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे.
श्रीमती पल्लवी उमरे यांना विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आलेले आहे. साहित्याबरोबरच त्यांना सामाजिक कार्याची आवड असून त्यांनी मिशन आयएएसच्या कार्याचा विस्तार करण्यासाठी सातत्याने पुढाकार घेतला आहे.

राज्यस्तरीय पुरस्कार मिळाल्याबद्दल पल्लवी उमरे यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

– लेखन : प्रा.डॉ.नरेशचंद्र काठोळे.
संचालक मिशन आयएएस. अमरावती
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️+919869484800