Friday, October 17, 2025
Homeसाहित्यगंध चाफ्याचा

गंध चाफ्याचा

गंध चाफ्याचा येताना
तुला सोबती आणले
शांत समुद्र किनारी
मन होते विसावले //१//

दिले घेतले वचन
एकनिष्ठ राहण्याचे
एकरुप होऊ दोघे
दिस आले आनंदाचे //२//

गंधाळून जाऊ दोघे
सुगंधित चाफ्यामध्ये
चिंब भिजून जाऊया
सागराच्या लाटांमध्ये //३//

ओंजळीत घेऊ फुले
सुगंधित या चाफ्याची
साद सागराची येते
साक्ष देण्यास प्रेमाची //४//

रंग पिवळा चाफ्याचा
लोचनांना सुखावतो
साथ मिळे तुझी जेव्हा
मोगराही बहरतो //५//

वेड्या मनाला नेहमी
गंध आवडे चाफ्याचा
गोड छायेत चंद्राच्या
खेळ रंगे मिलनाचा/ /६//

परवीन कौसर

— रचना : परवीन कौसर. बेंगलोर
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. खूप खूप धन्यवाद अगदी मनापासून अशी सुंदर भेट दिली कविता

  2. एकरुपतेने राहील्यानेच माणसांना आनंदाचे दिवस येतील हा चांगला संदेश गंध चाफ्याचा काव्यातून परवीन कौसरताईंनी दिला आहे.

    गोविंद पाटील
    जळगाव महाराष्ट्र

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप