Thursday, July 3, 2025
Homeपर्यटन'गगनचुंबी शिकागो' ( ३ )

‘गगनचुंबी शिकागो’ ( ३ )

शिकागो शहर हे अमेरिकेच्या इलिनाॅय राज्यातील सर्वात मोठे व अमेरिकेतील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे. लेक मिशीगनच्या किनारी वसलेल्या या शांतताप्रिय शहराची वस्ती वीस लाखाहून जास्तच आहे.

शिकागोला अनेक टोपण नावाने संबोधत असले तरी ते पवित्र आत्म्यांचे शहर pure soul म्हणून ओळखले जाते. शिकागो शहर आणि भारतीयांचे एक भावनात्मक नाते जोडले आहे. सप्टेंबर 1893 मध्ये आयोजित केलेल्या जागतिक सर्वधर्म परिषदेत भारत भूमीचे महान सुपुत्र स्वामी विवेकानंद यांनी हिंदु धर्माची महती विशद करणारे भाषण दिले होते.

त्या ऐतिहासिक भाषणाची सुरुवात “माझ्या अमेरिकेतील बंधु आणि भगिणीनो” अशी केली होती. आणि या वाक्याने सभागृहातील श्रोत्यांनी स्वामींना उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात अभिवादन केले होते. जगाला हिंदुधर्माचे तत्वज्ञान सांगितले होते. म्हणून मी भावनात्मक नाते असे म्हटले आहे.

शिकागो हे गगनचुंबी इमारती निर्मीतीचे जन्मगाव किंवा पाठशाळा समजली जाते. आभाळाशी स्पर्धा करणार्‍यां इमारती येथे बांधण्याची सुरुवात येथेच झाली. डॅनियल बॅनहॅमने मिशीगन लेकचे सुशोभीकरण सुरू केले आणि त्याच्या आराखड्यानुसार जगप्रसिध्द शोअर ड्राईव्ह निर्माण झाले, तद्नंतर मग शिकागोतील उंचच उंच इमारती बांधण्याचा सिलसिला सुरू झाला. याच थोर वास्तुविशारदाने न्यूयॉर्क शहराला घडविले, नटविले, सजविले. त्याबाबत काय आणि किती लिहावे तितके थोडेच !

डाॅनियलचे एक वाक्य येथे देऊ इच्छितो, तो म्हणत असे “माणसाने लहान स्वप्ने पाहूच नयेत ती नेहमी मोठ मोठालीच पाहावीत”! त्याने शिकागो नगरी मनापासून सजविली.
शिकागोत अनेक प्रेक्षणीय स्थळे आहेत. The Art Institute Chicago, नेव्ही पिअर, मिलेनियम पार्क, शेड्द मत्स्यालय, क्लाऊड गेट, भव्य दिव्य लिंकन पार्क. येथे शिकागो पार्क डिस्ट्रिक्ट ची स्थापना 1920 साली झाली. एका पार्कसाठी 8000 हजार एकरची व्याप्ती त्यात 580 बगीचे आहेत. मनोरंजनाच्या, खेळाच्या, विश्रांती, स्वच्छतागृहे सर्व काही उपलब्ध आहेत. मोकळ्या जागे बाबतची श्रीमंती आपल्या लक्षात येईल.
(क्रमश:)

भास्कर धाटावकर

– लेखन : डाॅ.भास्कर धाटावकर.
निवृत्त पुराभिलेख संचालक, महाराष्ट्र शासन
– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments