“कला साहित्य भूषण” या श्री देवेंद्र भुजबळ यांच्या दहाव्या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच कांदिवली, मुंबई येथे आयोजित करण्यात आलेल्या स्नेहमिलन कार्यक्रमात संपन्न झाले.
कला आणि साहित्य क्षेत्रातील तीस व्यक्तींच्या प्रेरणादायी जीवन कथा असलेल्या या पुस्तकात गझल नवाझ, भिमराव पांचाळे; लेखिका आणि कवयित्री, मोहना कारखानीस; प्रतिभा सराफ; यांच्याही जीवन कथा असल्याने, त्यांच्याहस्ते तसेच सौ अलका च्या “कॉमा” पुस्तकाचे प्रकाशन केलेल्या डिंपल पब्लिकेशन्स चे अशोक मुळे; माझ्या ‘गगनभरारी, स्वातंत्र्यवीर सावरकरांची जाज्वल्य पत्रकारिता, प्रेरणेचे प्रवासी, समाजभूषण’ ही चार पुस्तके प्रकाशित केलेल्या भरारी प्रकाशनाच्या लता गुठे; कोकण मराठी साहित्य परिषदेच्या अध्यक्षा नमिता कीर; साहित्यिका गौरी कुलकर्णी; कार्यक्रमाच्या आयोजक, सिंगापूर स्थित मोहना आणि संजय कारखानीस यांच्याहस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाल्याने ते मोठेच औचित्याचे ठरले.

गझल नवाझ भिमरावजीनी भाषणबाजी न करता, संगीताची साथ संगत नसताना देखील त्यांच्या गझला पेश करून असा काही माहौल तयार केला की, शब्दांमध्ये गुंतलेले रसिक, त्यांच्या अर्थपूर्ण, आर्त सुरांमध्ये कधी, कसे हरवले, ते त्यांचे त्यांनाच कळाले नाही ! त्यांच्या या गायनाने केवळ पुस्तक प्रकाशन समारंभच नाही तर स्नेहमिलन कार्यक्रम उपस्थित रसिकांच्या सदैव स्मरणात राहील.

श्री देवेंद्र भुजबळ यांनी यावेळी या पुस्तकात रेखाटलेल्या व्यक्ती, त्यांची वैशिष्ट्ये, समाजासाठी ते देत असलेले योगदान याविषयी माहिती दिली. या पुस्तक प्रकाशनासाठी देश विदेशातून प्राप्त झालेल्या मित्रांच्या, स्नेह्यांच्या शुभेच्छा लाभल्याने माझ्या आनंदात खूपच भर पडली, असे सांगून त्यांनी ‘कला साहित्य भूषण’ ला वाचकांची पसंती लाभेल, अशी आशा व्यक्त केली.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800

अनेक उच्च पदे आपल्यासमोर हात जोडून उभी असताना आपण समाजसेवेसाठी, सकारात्मकतेसाठी आणि मुख्य माणसे आपल्या छंदातून इतरांना आनंद देण्याचा प्रयत्न करत आहात, ही खूप कौतुकास्पद गोष्ट आहे!
आपला कित्ता इतरांनी गिरवावा असे आपले स्वतःचेही व्यक्तिमत्व आहे.
‘कला -साहित्य भूषण’ साठी खूप खूप शुभेच्छा🌷
मनापासुन अभिनंदन साहेब
Congratulations & Buck up