गझल मंथन साहित्य संस्था आणि आम्ही सिद्ध लेखिका यांच्या संयुक्त विद्यमाने ठाण्यातील वारकरी भवन येथे नुकतेच मराठी गझल लेखन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यशाळेत विख्यात गझलकार डॉ. कैलास गायकवाड, श्री. प्रमोद खराडे आणि डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.
दुपारच्या सत्रात, डॉ. स्नेहल कुलकर्णी (गारगोटी) यांच्या अध्यक्षतेखाली श्रीमती उत्तरा जोशी (देवगड), रत्नमाला शिंदे (मुंबई), ज्योत्स्ना चांदगुडे (पुणे), ज्योत्स्ना राजपूत (पनवेल), विजया टाळकुटे (पुणे), जयश्री वाघ (नाशिक), संध्या पाटील (सातारा), सुनिती लिमये (पुणे), वैशाली मोडक (डोंबिवली), हर्षदा अमृते (ठाणे) या महिला गझलकारांचा मुशायरा संपन्न झाला.
जागतिक महिला दिनाच्या अनुषंगाने महाराष्ट्र बाजार पेठ संस्थेकडून पैठणी देऊन प्रत्येक महिला गझलकाराचा सन्मान करण्यात आला.
गझल प्रशिक्षक म्हणून भरीव योगदान देणाऱ्या सौ. उर्मिला (माई) बांदिवडेकर यांना सन्मान चिन्ह आणि पैठणी देऊन गौरवण्यात आले.
या प्रसंगी बोलताना गझल मंथन साहित्य संस्थेचे अध्यक्ष श्री. अनिल कांबळे यांनी गझल लेखन कार्यशाळा आयोजन समितीची घोषणा केली. ही समिती पुढीलप्रमाणे आहे :
अध्यक्ष- मनोज वराडे
उपाध्यक्ष- ॲड मुकुंदराव जाधव
सचिव- प्रदीप तळेकर
सह सचिव- बा. ह. मगदूम
कोषाध्यक्ष- सौ. प्रणाली म्हात्रे
यावेळी १३ आणि १४ मे २०२३ रोजी परभणी येथे होणाऱ्या गझल संमेलनाची माहिती देण्यात आली. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून सुप्रसिद्ध गझलकार श्री. प्रमोद खराडे यांची निवड करण्यात आली.
– टीम एनएसटी. ☎️ 9869484800
वाह…! खूपच छान…!!
.. प्रशान्त थोरात,
पुणे कार्यवाह, गुरुकृपा संस्था.
9921447007