चुकलो कधी जरा तर ती सावरून घेते
माझ्या चुका हजारो ती चालवून घेते
चिडलो चुकून जर का सॉरी म्हणून जाते
भांडण अशा प्रकारेती संपवून घेते
तक्रार एक साधी नाही करीत कसली
डोळ्यात आसवांना ती साठवून घेते
जे जे मला हवे ते देते नवीन सारे
वस्तू जुन्या-पुराण्या ती वापरून घेते
जगण्यामधे जराही कचरा तिला न रुचतो
श्वास श्वास अगदी ती पाखडून घेते
केंव्हाच ती अधिकची नाही करत अपेक्षा
जितके असेल त्यातच ती भागवून घेते
दुःखास कोणत्याही पळवून लावते ती
माझ्या घरी सुखांना थांबवून घेते ती

– रचना : शेखर गिरी
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800