Monday, February 16, 2026
Homeसाहित्यगझल : नाजुक शेर.....

गझल : नाजुक शेर…..

रंग काळा मात्र तरिही खास आहे
देव पाषाणात करितो वास आहे

डोंगरा इतका कुणी दिलदार नाही
आत पाणी वर वनाची रास आहे

माय होतांना मुलांची काळ म्हणतो
जीव दोन्हीही कुळांचा श्वास आहे

तांदळाची पेज कर वा भात बनवा
सान थोरांचाच पहिला घास आहे

जीव माझा मी हरीचा श्वास कारण
चित्त माझे चालकाचा दास आहे

वाम मार्गावर कधी जर पाय वळले
बंधनाला उंबरा दारास आहे

शेर गझलेचा कधीही क्लिष्ट नसतो
दोन मिसऱ्यांवर तिचा विश्वास आहे

बी दुभंगत ना कधीही तांदळाचे
मान मोठा एक दल बीजास आहे

खूप नाजुक शेर कोणी वाचल्यावर
वाव येथे ओह ! वाहव्वास ! आहे

प्रज्ञा कुलकर्णी

– रचना : सौ. प्रज्ञा कुलकर्णी. वसमत
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11