Monday, February 16, 2026
Homeसाहित्यगझल : मनात येते

गझल : मनात येते

मनात येते बरेच काही लिहून घ्यावे
सुख दुःखाने भरून प्याले पिऊन घ्यावे

विणले कापड आयुष्याचे क्षण धाग्यांनी
जीर्ण तयाचे अस्तर पुन्हा शिवून घ्यावे

रुजले अंकुर स्वप्न सुखाच जळून गेले
तरी वाटते त्या आशेला खिळून घ्यावे

तुटली नाती येवून गेल वादळ जेव्हा
शोध तयांचे मनात येते फिरून घ्यावे

उरल्या सुरल्या गत काळाच्या पाचोळ्यांचे
झरले अमृत पापण्यांतले पिळून घ्यावे

सुधीर नागले

– रचना : सुधीर नागले. गोरेगाव – रायगड
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

3 COMMENTS

  1. ही गझलच आहे,
    वृत्त- अननज्वाला
    मात्रा – ८ + ८ + ८ प्रत्येक ओळीत
    यात लगावली नाही . मात्रा मोजतात . धन्यवाद !

  2. मनात येते ही गझल काव्यरचना छानच आहे .अर्थपूर्ण आहे.
    पण मूळात यास गझल म्हणायचे का ही शंका आहे.
    कारण लगावली यात दिसत नाही.
    पहिल्या ओळीतली लगावली
    गलाग गागा गलाग गागा गलाग गागा
    पुढच्या ओळींत सापडत नाही.
    कृपया शंकेचं निरसन करावे. गैरसमज नसावा.
    काव्य छानच आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Kavitha Tenny Nadar on झेप : 11