पापण्यांना भिजवलेत कोणी न कोणी
आरसेही बदललेत कोणी न कोणी..
सावलीचा लपंडाव नको ना मना रे
खेळ इथले निवडलेत कोणी न कोणी
सोबतीला खडे नेत जावे अताशा
सोबतीचे हरवलेत कोणी न कोणी..
मांडला डाव पडला उलटलाच सारा
भावनांना फसवलेत कोणी न कोणी..
काळ ही बदलतो माणसांच्या प्रमाणे
सद्गुणांना घडवलेत कोणी न कोणी..
— रचना : दिपाली महेश वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
