भुजंगप्रयात वृत्त
नव्याने पुन्हा मी जगू पाहते रे
मनी मानसी मी फुलू पाहते रे..
मला पामराला न साथीस कोणी
नशीबा सवे खाजगी भांडते रे..
नको चांदराती नको गर्द छाया
उन्हाच्या झळा लीलया साहते रे..
नभी तारकांचा असा भार व्हावा
तसा भार पाठीवरी वाहते रे..
अहा आपुल्यांनी जसे घाव केले
तसे घाव ओले उरी बांधते रे..
अता रे सहारा असा मृगजळाचा
सुखाच्या सरींनी अशी नाहते रे..
अता रे विसावा असा पाहते की
विजन वाळवंटी सुखी नांदते रे..
— रचना : डॉ मीना बर्दापूरकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800