आनंदकंद वृत्त
ध्यासात पेलले मी आभास मृगजळाचे
शोधू कशी सुखाला आभाळ दाटलेले
जोपासले उरी मी जे पाश रेशमाचे
नाजूक भासती ते भासात बांधलेले
माघार घेतलेले मागायचे कशाला
दुर्बोध शब्द माझे मौनात बोललेले
झोळीत दान माझ्या टाको कुणी कितीही
झोळीतल्या सुताचे टाकेच फाटलेले
नात्यातल्या दुव्यांची जाणीव पेलताना
तोडून टाकले मी ते पाश पाळलेले
✍🏻 डॅा मीना बर्दापूरकर. ठाणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800