एकटे बळी गेले कारण होते एकटेच मी
माणसात या फार उरले आता एवढेच मी..
जगून साधे सत्य काय ते सारे कळू लागले
सरळ राहिले पण जगा पुढे ठरले वाकडेच मी..
संथ राहणे, गोड बोलणे शिकले नाही नुसते
खरे बोलुनी आज उडवले बहुधा कावळेच मी..
ना मी कोणा सारखे नसे माझे द्वेष कुणाशी
वाऱ्यालाही सांगत जाते माझ्या सारखेच मी..
सुखदुःखांच्या ओझ्याखाली चाले जीवन नौका
दोष जगाचे जरी निघाले तेही झाकलेच मी..
— रचना : दिपाली वझे. बेंगळूरू
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800