कुणासाठी येतो सांगा
वर्षा ऋतू वर्षातुनी
देतो गर्द हिरवाई
अंथरतो रंगातुनी
भाद्रपद येता दारी
गौरी पूत्र विराजतो
खुश करण्यास राजा
तृण,फूलं,फळं देतो
बाप्पा महत्त्व सांगतो
शीतकारी त्या दूर्वांचे
शक्ती गुणांनी स्थापित
रक्तवर्णी जास्वदांचे
मोद पेरतो पारीत
देतो सारण सौख्याचे
उकडीच्या वाफेवर
सरे घन ते दुःखाचे
भले आवाजही देतो
सदा एकेरी नावाने
गणू,गणेश,गणुल्या
नाते जोडतो मनाने
विघ्न राजेंद्र म्हणता
अष्ट सिद्धीही लाभते
स्तोत्र पठण करता
इष्ट चित्त स्थिरावते
वय सान असो मोठे
शिवगौरी सांभाळते
बुद्धी दाता गणेशाला
रिद्धी सिद्धी साथ देते

— रचना : सौ.प्रज्ञा कुलकर्णी. वसमत
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800