जयदेव जयदेव जय मयुरेश्वरा
गणेश उत्सव तुमचा करूया साजरा ॥धृ॥
भाद्रपद चतूर्थी गौरीसुत आला
लहान थोरांना आनंद झाला
सुखकर्ता दुखहर्ता बाप्पा तू देवा
तुजला नमुनी करती कार्यारंभाला
उत्सव मोठा चाले बल्लाळेश्वरा
गणेश उत्सव तुमचा करूया साजरा ॥१॥
स्थापुनी तव मूर्तीला सुंदर मखरात
कोणी पूजिती तुज देव्हार्यात
दुर्वा शमीपत्रे वाहुनी जास्वंदी
दिसते तवमुख आम्हा भारी आनंदी
लाडू मोदकांचा प्रसाद स्वीकारा
गणेश उत्सव तुमचा करूया साजरा ॥२॥
ब्रम्हमूहूर्ती अभ्यंगस्नान
वक्रतुंड महाकाय मंत्र जपून
जमले गोत सारे भजन पूजन
बाप्पा भक्तांचे करिती रक्षण
मनोभावे प्रार्थिती तुज विघ्नेश्वरा
गणेश उत्सव तुमचा करूया साजरा ॥३॥
आरती करूनी आता भोजन करावे
प्रसन्नवदने चित्त शुद्ध ठेवावे
बाप्पा ठेविल मग तो कृपाहस्त शिरा
गणेशउत्सव तुमचा करूया साजरा ॥४॥

– रचना : अरूणा मुल्हेरकर. अमेरिका
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
सुरेख आरती.भक्तीरसमययुक्त.
आरती छान, 👍 ताल सुरात वदवून /गाऊन म्हणजेच रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करावा. 🌷
🙏🌹गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया 🌹🙏