“आजच्या गतिमान जगात व्यवसाय, शासकीय यंत्रणा तसेच वैयक्तिक जीवनात यशस्वी होण्यासाठी धोरणात्मक व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे,” असे प्रतिपादन पुणे बुक फेस्टिव्हलचे मुख्य संयोजक व नॅशनल बुक ट्रस्टचे ट्रस्टी श्री. राजेश पांडे यांनी केले.
‘स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट’ या पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच पुणे बुक फेस्टिव्हल मध्ये श्री. पांडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी ते बोलत होते.

श्री पांडे पुढे म्हणाले की, “हे पुस्तक व्यवसाय, शासकीय विभाग तसेच वैयक्तिक पातळीवरही उपयुक्त आहे. डॉ. राणे यांनी आपल्या अभियांत्रिकी व व्यवस्थापनातील समृद्ध अनुभवाच्या आधारे हे पुस्तक अत्यंत परिश्रमपूर्वक साकारले आहे.”
या प्रसंगी उच्च शिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.

पुस्तकाचे सहलेखक डॉ. डी. पी. राणे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “‘स्ट्रॅटेजी’ हा शब्द मूळचा लष्करी क्षेत्रातून आलेला असून, आज त्याचा प्रभावी वापर कॉर्पोरेट व व्यवसाय व्यवस्थापनात होत आहे. व्यवसाय म्हणजे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर उत्पादने आणि सेवांसाठी बाजारपेठ जिंकण्याचे युद्धच आहे. व्हिजन आणि मिशन स्टेटमेंटच्या अनुषंगाने उद्दिष्टे साध्य करण्यासाठी सर्व संसाधनांचा योग्य वापर म्हणजेच धोरणात्मक व्यवस्थापन होय.”

या प्रसंगी महाराष्ट्र शासनाच्या उच्चशिक्षण विभागाचे संचालक डॉ. शैलेंद्र देवळणकर यांनी दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमास डॉ. एस. यू. गावडे, संचालक – सिंहगड टेक्निकल एज्युकेशन सोसायटी, पुणे, श्री. मनोज गोगटे ,अध्यक्ष – सार्वजनिक वाचनालय, श्रीवर्धन, श्री. चंद्रकांत मिसाळ, संचालक – व्हिजन ॲकॅडमी, पुणे), तसेच राजेंद्र दोडमिसे, साहेबराव म्हस्के, दत्तात्रय आठवले आदी उपस्थित होते.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
