आर्थिकदृष्ट्या सक्षम नसलेल्या मुलांना आजच्या कठीण काळात शिक्षण आणि नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी युवकांच्या कल्याणासाठी कार्य करणाऱ्या नायरा फौंडेशन ही स्वयंसेवी संस्था आणि प्रसिद्ध निवेदिका उत्तरा मोने यांच्या मिती ग्रुपच्या संयुक्त विद्यमाने “प्रोजेक्ट सेतू” हा उपक्रम सुरु करण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत गरीब पण होतकरू मुलांना विनामूल्य ऑनलाइन प्रशिक्षण व नोकरी, व्यवसाय मार्गदर्शन करण्यात येईल. प्रसंगी त्यांना नोकरीची संधी सुध्दा दिली जाईल. या प्रशिक्षणा साठी उमेदवार हे किमान १२ वी उत्तीर्ण असावेत.
तरी आपल्या संपर्कात असणाऱ्या, गरजू लोकांना ही माहिती नक्की पाठवा. किंवा त्यांना 9930115759 या नंबरवर फोन करायला सांगा.
आर्थिक अडचणींमुळे एखाद्या योग्य व्यक्तीची संधी यामुळे हुकणार नाही. तेंव्हा त्यांच्या विकासासाठी आपला खारीचा वाटा नक्की उचलू या.
– देवेंद्र भुजबळ, 9869484800
नमस्कार सर
अत्यंत स्तुत्य उपक्रम आहे.
संचालकांचे अभिनंदन.
धन्यवाद सर.