आज सकाळी सकाळी
तूंही यादं लय आली
पिलं तोडूनीया दोरी
जव्हा पान्ह्याला लागली
मुक्या जीवाचीही धावं
घावं घालूनीया गेली
तशी आठवणं तूंही
जीवं घेवूनीया गेली
तूंह्या सावलीची ओढं
भारी मनाला लागली
जीत्या जीवं दिला आजं
माया पातळगा केली
जव्हा अंधाराच्या वाटं
तूंही चाहूलं लागली
जणू वाळूच्या वाटनं
सारी तहानं भागली
रंजगांजल्या जीवाशी
अशी सोयरीकं केली
काट्याकुट्याच्या वाटनं
जणू आमराई झाली
हाती फुटकं खापरं
काया चालाया लागली
दीनं अनाथांच्या पोटी
घासं घालाया लागली
अंध नागव्यांची रांगं
तूह्या मागुती लागली
जव्हा ऊजीडाच्या वाटं
तूंही पाऊलं लागली
– रचना : ॲड विजयकुमार कस्तुरे