स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या वाढदिवसानिमित्त मुंबईची अग्रगण्य संस्था ‘सरगम म्युझिक लॅब‘ ने येत्या रविवारी ठाणे येथे ‘गाण्यांची मॅरेथॉन‘ हा एक अनोखा उपक्रम आयोजित केला आहे.
यामध्ये 50 उत्तम गायक गाणार आहेत बॉलीवूडची 100 लोकप्रिय हिंदी गाणी. सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत ही गाण्यांची मॅरेथॉन होत असून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन 10 सुसंवादक/सुसंवादिका करतील. तसेच आपल्या वाद्य संगीताने 100 गाण्यांना स्वरसाज चढवत सर्वांना मंत्रमुग्ध करतील 10 उत्तम वादक कलाकार.
या कार्यक्रमाची नोंद OMG Book of World Record मध्ये होणार आहे.
या कार्यक्रमाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक 20 गाण्यांच्या सादरीकरणा नंतर रसिकांसाठी एक लकी ड्रॉ होईल आणि विजेत्यांना एक चांदीचे नाणे भेट म्हणून देण्यात येईल. हा कार्यक्रम निःशुल्क आहे.
– लेखन : अलका भुजबळ. 9869484800