संगीत कलेचे मनुष्य जीवनात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संगीत, गायन यामुळे मानवी जीवन आनंदमय बनविता येते.
मनुष्याला कला स्वाद, कला आनंद लुटता यावा म्हणूनच भगवंताने खऱ्या अर्थाने त्यात अंतर्भाव निर्माण केले आहे. कला ही भगवंताचे दुसरे रूप आणिकलाकार हा त्याचा पुजारी. आज जगभर मानसिक आरोग्य आणि इतर समस्या वाढल्या आहेत. नकारात्मक, भीती त्याच बरोबर ताणतणाव वाढल्याने
चिंताग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्याच्या परिणामी मानवी मनावर जबरदस्त ताण निर्माण झाला आहे.
संगीत हा ताण तणाव दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी
उपचार ठरतो. अगदी प्राचीन काळापासून
मानसोपचारात संगीत उपचार चालत आले आहे.
अध्यात्म आणि त्याबरोबर सांस्कृतिक कलांनी आपल्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. ते आनंददायी
आणि मनोरंजक आहे.

अहमदनगर येथील हरहुन्नरी कलाकार हेमंत दंडवते यांनी गणपती बाप्पाचे गायक रूपात चित्र रेखाटले
आहे. गंमतीशीर बाब म्हणजे मूषक परिवार बप्पाच्या गायन संगीतास विविध वाद्यवृंद द्वारासाथ देत आहे. बाप्पा स्वतः पेटी वाजून अगदी तल्लीन होऊन
गात आहे. असे बोलके चित्र जलरंगात दंडवते यांनी
रेखाटून मनुष्याने पण कला आत्मसात करावी असा संदेश या चित्राद्वारे दिला आहे, तो नक्कीच अनुकरणीय आहे.
– टीम एनएसटी. 9869484800
🌹खूप सुंदर 🌹
आपल्या न्यू स्टोरी टुडे च्या माध्यमातून वेगवेगळ्या क्षेत्रातील कला व कलाकार यांची माहिती समाजा पर्यंत पोहचवता, आपले मनपूर्वक धंन्यवाद…