Sunday, July 6, 2025
Homeबातम्यागिर्यारोहक तुषार पवार यांचे आवाहन

गिर्यारोहक तुषार पवार यांचे आवाहन

नमस्कार, मित्रांनो.
मी तुषार हणमंत पवार, येत्या 26 जानेवारी 2022, भारताच्या प्रजासत्ताकदिनी जगातील सात खंडातील सर्वोच्च शिखरांपैकी क्र.2 चे अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर अकांकागुवा (6962) मीटर उंचीचे शिखर सर करून भारताचा तिरंगा व महाराष्ट्र पोलीस ध्वज फडकवत राष्ट्रगान करून प्रजासत्ताकदिन साजरा करून महाराष्ट्र पोलीस दलाचे नेतृत्व करणार आहे, तसेच महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक भगवा फडवणार आहे.

असे करताना मला सार्थ अभिमान आहे की, मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात जन्माला येऊन महाराष्ट्र पोलीस म्हणून सेवा बजावत गिर्यारोहण सारख्या साहसी खेळामध्ये देशातच नव्हे तर जागतिक पातळीवर महाराष्ट्र पोलीसचे नाव उंचावत आहे.

त्यासाठी आवश्यक शारिरीक, मानसिक व अटल बिहारी वाजपेयी गिर्यारोहण प्रशिक्षण संस्था मनाली (ABIMAS) येथून तांत्रिक प्रशिक्षण घेऊन आवश्यक ती कौशल्ये मी आत्मसात केली आहेत.

पण याच बरोबर मला गरज आहे ती आर्थिक मदतीची. या मोहिमेसाठी 6 लाख रुपये खर्च येणार असून एवढी रक्कम माझ्या आवाक्याबाहेरील आहे. त्यासाठी तुमची छोटीशी मदतही माझ्यासाठी खूप मोलाची ठरणार आहे.

आत्तापर्यंत मी पुढीलप्रमाणे मोहिमा यशस्वीपणे पूर्ण केल्या आहेत.
1) 26 जानेवारी 2019 -आफ्रिका खंडातील सर्वोच्च शिखर माउंट किलीमांजारो (5895) मीटर.

२) 15 ऑगस्ट 2019- युरोप खंडातील सर्वोच्च शिखर माउंट एलब्रूस (5642) मीटर.

वरील दोन्ही शिखरावरती चढाई करणारा व गणवेश परिधान करून प्रजासत्ताकदिन व स्वातंत्रदिन साजरा करणारा मी भारतातील पहिलाच पोलीस ठरलो आहे.

3) 25 सप्टेंबर 2021- उत्तराखंड मधील भागीरथी 2 शिखर (6512) मीटर.

त्याचबरोबर सह्याद्रीतील गडकिल्ले, सुळके यशस्वीपणे पार केले. मी एक खेळाडू असून, पोलीस दलात दाखल झाल्यापासून उत्कृष्टरित्या खेळत आलो आहे.

भविष्यात जगातील 7 खंडांतील 7 सर्वोच्च शिखरं सर कऱण्याचा माझा मानस असून, 2022 मध्ये जगातील सर्वोच्च शिखर माऊंट एव्हरेस्ट मोहिमेसाठी ही आकांकागुवा मोहीम मला खूप महत्त्वाची ठरणार आहे.

तरी 26 जानेवारी 2022 अमेरिका खंडातील सर्वोच्च शिखर मोहिमेसाठी मी आपल्याकडे मदतीचे आवाहन करीत आहे. कृपया आपण आपली मदत पुढीलप्रमाणे देऊ शकता.
Mobile: 7620242839 phone Pay/Google pay

Bank – Axis
Ac No:917010039276670
IFSC:UTIB0000072
Branch-like Vashi

तरी कृपया आपण मला या मोहिमेसाठी आर्थिक मदत करून गिर्यारोहण क्षेत्रात देश व जागतिक पातळीवर महाराष्ट्र पोलीसचे नाव उंचावण्याची संधी द्यावी ही विनंती.

आपला सहकारी मित्र,
तुषार हणमंत पवार.
पोशि/ 4104
धन्यवाद 🙏

– संपादन : देवेंद्र भुजबळ. 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments