Saturday, March 15, 2025
Homeकलागीता सार' नृत्य प्रथम

गीता सार’ नृत्य प्रथम

नवी मुंबईतील विष्णुदास भावे नाट्य गृहात आयोजित करण्यात आलेल्या नेरुळ येथील टिळक ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स ॲण्ड कॉमर्स वार्षिक स्नेहसंमेलनात सादर करण्यात आलेल्या आत्मन
(दि सेल्फ अवेकनिंग) अर्थात स्वयंजागृती या कथाबीजावर आधारित समुह नृत्याविष्कारामध्ये अकरावी सायन्स सी व डी च्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या ‘गीता सार’ समुहनृत्यास प्रथम पारितोषिक मिळाले. सुमारे तीनशेहुन अधिक विद्याथ्यार्ंनी मोठ्या उर्जेनिशी यावेळी समुहनृत्ये सादर केली.

श्रीकृष्ण आणि त्याची विविध रुपे जसे चांगला पुत्र, सुयोग्य मित्र, प्रिय सखा, सणाउत्सवांतील कृष्ण, संगीतज्ञ म्हणून कृष्ण, नैराश्य झटकून अडचणींवर उपाय सांगणारा कृष्ण अशा विविध कथाबीजांवर आधारीत विविध सुरेख नृत्याविष्कार विद्यार्थी समुहांनी
सादर केले.

यावेळी केलेल्या प्रमुख पाहुणे, नादम जिएसईचे व्यवस्थापकीय संचालक रघुनंदन जगदीश यांनी विद्यार्थ्याना संबोधित करताना सांगितले की, आयुष्याचे उद्दिष्ट निश्चित करावे, वेळेचे मोल जाणावे, सतत शिकण्याची वृत्ती ठेवावी, चांगले आदर्श आणि उत्तम पुस्तके वाचावी व दैनंदिनी लिहायची सवय ठेवावी, अशा सवयी अंगी बाणवण्याचा सल्ला दिला.

यावेळी शैक्षणिक, क्रीडाविषयक तसेच उत्तम वर्ग, वर्गप्रतिनिधी, वर्षभरातील सर्वांगीण उत्तम कामगिरी करण्याऱ्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देऊन गौरवण्यात आले.

प्राचार्या डॉ हिना सामानी यांनी प्रास्ताविक केले. धन्या नायर यांनी सूत्रसंचालनाची बाजू सांभाळली. तर नितू राय यांनी आभारप्रदर्शन केले.

या कार्यक्रमास गायक- संगीतकार प्रशांत नावती, नृत्यांगना श्रीजिता बॅनर्जी, गायिका सोनाली सोनावणे, टिळक एज्युकेशन सोसायटीचे व्हाईस चेअरमन व संचालक डॉ अजित कुरुप, एस के. कॉलेज, नेरुळच्या प्राचार्या विद्या मुरली, टिळक पब्लिक स्कूलच्या प्राचार्या
रुबी वर्गीस,अन्य मान्यवर आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments