एरव्ही रफटफ वाटणाऱ्या पोलीस खात्यातील अधिकारी, कर्मचारी हे सुध्धा किती कवीमनाचे असू शकतात, किती संवेदनशील असतात याचे उदाहरण म्हणून निवृत्त सहायक पोलीस आयुक्त श्री रविकिरण पराडकर यांचे देता येईल.
आषाढी एकादशी निमित्त श्री रविकिरण पराडकर यांनी सुंदर गीत लिहिले आहे. हे गीत अतिशय गोड आवाजात श्री विश्वास सनगरे यांनी गायले असून त्यांना हार्मोनियम वर श्री चैतन्य पटवर्धन यांनी, तबल्यावर श्री अभिषेक भालेकर यांनी तर ताल वाद्यावर श्री ईशान खानोलकर यांनी साथ दिली आहे. तर श्री विजय रानडे हे संगीतकार आहेत.
हे सुमधुर विठ्ठल गीत पुढील लिंक वर क्लिक करून आपण ऐकल्यास, पाहिल्यास आपण सुध्दा निश्चितच विठ्ठलमय होऊन जाल.
आपल्या प्रतिक्रिया अवश्य कळवा.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
फार गोड गळा.
रचना,शब्द रचना
चालही
एकूण गणित छान.
मा. देवेंद्रजी,
आपण आपल्या अत्यंत लोकप्रिय आणि दर्जेदार पोर्टलवर माझ्या भक्तिगीताची दखल घेतलीत, प्रसिद्धी दिलीत, त्याबद्दल मनापासून आभार.
जाणकार व्यक्तींकडून असा अभिप्राय मिळाला की मन सुखावते.
विशेष म्हणजे आपण संगीतकार, गायक, वादक यांचीही आवर्जून प्रशंसा केलीत हे महत्वाचे. कारण शेवटी हे टीमवर्क असते. त्यांनाही मी हे जरुर पाठवत आहे.
असाच लोभ रहावा.
धन्यवाद.
… रविकिरण पराडकर
गीतकार मान.श्री.रविकिरण पराडकर सर अतिशय सुंदर अभंग रचना, सुमधुर संगीत व सुरेख चालीवर खूपच छान
मंत्रमुग्ध करणारं सादरीकरण.आपल्या संपूर्ण टीमचे मनःपूर्वक अभिनंदन.