१) संकल्प
कोरोनाचे भीषण संकट
होते अनिश्चित अन् भयावह,
वैद्यकीय उपायांसोबत
आले कामी मानसिक बळ
अन् सामाजिक स्नेह;
काळोख्या आठवणींना
मागे ठेवून,
केलेल्या कळत नकळत चुकांच्या क्षमा मागून,
नव्या वर्षाचा संकल्प सोडू या
पुढे पुढेच जाऊ या.
– रचना : प्रा डॉ सतीश शिरसाठ. पुणे
२) शुभांजली
••••••••••••••
आज असे या गुढीचा सन्मान,
वर्ष प्रतिपदेचा उत्सवला सण;
दारोदारी सडें, पहाट-रांगोळ्या,
सूर्योदय नव्हे, सोनियाची खाण।
🕉️🚩💥⚛️🍋⛱️🙏
– रचना : श्रीकृष्ण बेडेकर. इंदूर
३) चैत्रपाडवा
चैत्र शुद्ध प्रतिपदा
दारी गुढी ऊभी छान
नव्या वर्षाचा आरंभ
आनंदाचे गीत गान..
पाने फुले आंबा निंब
पाटावर रंगावली
वस्त्र रेशमी जरीकाठ
गुढी अशी सजवली…
महत्वाचा हिंदुसण
साडेतीन मुहुर्ताचा
नव्या वस्तु खरेदीचा
दिन शुभमांगल्याचा…
चौदा वर्षे वनवास
संपवूनी राम आला
गुढ्या दारी ऊभारल्या
आनंदीआनंद झाला….
विश्व निर्मीले ब्रह्माने
याच मासी याच दिनी
ब्रह्मध्वज कुणी म्हणे
काठी पूजा शुद्ध मानी…
ऋतु वसंत प्रसन्न
आतुरता स्वागताची
नवे वर्ष नवी स्वप्ने
गुढी असे प्रतीकांची…..
– रचना : राधिका भांडारकर, पुणे.
४) गुढीपाडवा
नवीन वर्ष नवी स्वप्ने
घेऊन आला गुढीपाडवा
आनंदाने करु साजरा
मनामनात होऊदे गोडवा
गुढी उभारु माणुसकीची
एकमेकांना साथ देऊया
होऊ सुख दुःखाचे वाटेकरी
सण आनंदाने साजरा करूया
जातपात धर्म पंथ कशाला
मनामध्ये नसावे भेदभाव
मिळून मिसळून राहूया
भांडणाचे नकोच नाव
निसर्गाची किमया न्यारीच
वेगवेगळ्या रंगांच्या छटानी
भरलेली ही दुनिया सारी
पक्षी गाती सुंदर गाणी
तसेच आपणही एका रंगात
जावू मिळून मिसळून स्वच्छंदी
सुखी समाधानी आयुष्य हे
जगूया होऊन आनंदी
नववर्षाच्या स्वागतासाठी
श्रीखंड पुरी, पुरणपोळी
सज्ज होऊया घेऊन गुढी
दारासमोर काढुनी रांगोळी
नवे संकल्प नवीन वर्ष
घेऊन आली ही नवीन पहाट
विश्वासाने नाते जोडता
येईल प्रेमाची सुंदर लाट
– रचना : परवीन कौसर, बेंगलोर
५) वर्षारंभ
मुहूर्तात या मुहूर्त
असे उत्तम वर्षारंभाचा
प्रारंभ करू शुभ दिनी
सारे निस्वार्थी कार्याचा ||१||
गुढीपाडवा करू साजरा
पाळूनिया धर्म रूढी,
चला उभारू अंगणी
नव चैतन्याची गुढी ||२||
जुनी जळमटे काढू
किलमीशे दूर करू
गुढी उभारू प्रेमाची
ध्यास मनी हाच धरू ||३||
विवेकाचा तो कलश
विश्वासाची वेळू काठी
कडुलिंब पानासंगे
साखरेच्या शोभे गाठी ||४||
मने जिंकण्या प्रेमाने
गुढी उभारू आकाशी
मैत्री वाढण्या स्नेहाने
नाती जपुया उराशी ||५||
– रचना : सौ.अनिता नरेंद्र गुजर. ठाणे
६) चैत्रपालवी
चैत्रमासी सकलजन
आनंदे गुढी उभारी |
चैत्रपालवी फुलली
निसर्गाची किमया न्यारी |
चैत्रगौर सजली
नटून आली घरी |
चैत्रआंगण सुरेख
रेखियले मी दारी |
– रचना : मंजू-प्रिया
७) 🎊गुढीपाडवा 🎊
जूनी गळाली पालवी
बघा शिशिर संपला
नुतन धुमांरसवे
गाली वसंत हासला ||🌹
गीत स्वागत म्हणन्या
असे कोकिळ सादर
ऋतु बघा कसे हे ..
एकमेकास देती आदर ||🌹
आम़वृक्ष मोहरला
शुभ्र चांदण्यांची शाल
पांघरून मोगरा नटला
चाफ्याने हा फेर धरला
कढीलिंब बहारिला || 🌹
पाना फुलांनी मांडव सजला
वसुंधरेचा हा लग्न सोहळा
नवचैत्यन सृष्टीचे या चला पाहूया
आनंदाने गुढ्या उभारुया
नर्वषाचे स्वागत करुया ||
🌹🎊🎊🎊🎊🌹
– रचना : आशा दळवी. फलटण. सातारा
८) “गुढी माणुसकीची”
धर्म, पंथ, लिंग भेद
यांना इथे नकोच थारा
प्रेमाने राहूया सारे
तिरस्काराचा नको वारा
माणुसकीची गुढी उभारू
एकमेकांसोबत राहू
कुणी उपाशी नको राहावया
सर्वांचीच काळजी वाहू
मानवतेचा धर्म तो पाळू
ज्येष्ठांचा सदा आदर करू
जुन्याचा सोडून दुराग्रह
परिवर्तनाची वाट धरू
– रचना : उद्धव भयवाळ. औरंगाबाद
९) नवा संदेश
सण गुढी पाडव्याचा आला
घेऊन संदेश आनंदाचा
दिन नववर्षाचा सौख्याचा
गुढ्या तोरणे चला उभारू
स्वागत नववर्षाचे करू ll
सडा शिंपूनी, रांगोळ्यांनी
शोभित अंगणा करुनि
नूतन वस्त्रे धारण करुनि
गोड नैवेद्य घेऊनि
मंदिरी दर्शनास जाऊ ll
कडुनिंब अन् आम्रतरू
आनंदाने लागले बहरु
सृष्टी नवचैतन्ये मोहरू
सेवन करू कडुनिंबाचे
रोग जातील पळुनी ॥
जाति, धर्म, भेद विसरोनी
करू या सण साजरा मिळोनी
होऊ दे नवा सूर्योदय
अवघे विश्वचि अपुले घर
सारे राहू एकदिलानी ॥
गोड धोड नैवेद्य गुढीचा
हाच संदेश
गुढी पाडव्याचा🚩
– रचना : सुलभा गुप्ते, ऑस्ट्रेलिया
🌹सर्व कविता अतिउत्तम 🌹
अशोक बी साबळे
Ex. Indian Navy
महाड
पाडव्याच्या निमीत्ताने केलेल्या सर्वच काव्यरचना आनंद स्नेह,
संस्कृती परंपरा सांगणार्या.जपणार्या.
आज खर्या अर्थाने गुडीपाडवा,नवा वर्षारंभ साजरा झाला.