Tuesday, July 1, 2025
Homeसाहित्यगुरूंच्या आठवणी

गुरूंच्या आठवणी

वापटी गावची ही बहिर्जी शाळा
मला घडविणारा गुरूंचा मळा

टेकाळे सर मुख्याध्यापक असे
इंग्रजी वाघाला बनविले ससे

थोरात गुरूजींचा मराठी लळा
सुंदर सुविचार सजला फळा

आकोशकर सरांची हिंदी भारी
कुलकर्णी सरांची ज्ञान तयारी

सुरूशे सरांची कवायत कला
मैदान सजले राष्ट्रीय सणाला

भोसले सरांचा इतिहास डोळा
शफीत शोधला मुस्लिम मावळा

बेंडके गुरूजींची सुत्र गणिती
रावजी गुरूजींची मित्र भूमिती

चेके गुरूजींची सदा धावपळ
जानीचं हो भलं मनी तळमळ

मोरे गुरुजींचा संघर्ष अटळ
कमी दृष्टीत अफाट बुध्दीबळ

नबीसाबाच्या हे अधिपत्याखाली
गेले आजोबा झाली काॅलनी खाली

— रचना : शेख शफी बोल्डेकर. कळमनुरी
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र. ग्रामीण मुस्लिम मराठी साहित्य संस्था , महाराष्ट्र.

    ।। सुंदर काव्यरचना ,गुरूंचा महिमा ।।

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

Dr.Satish Shirsath on कृषीदिन
Swati Chavan, मायबोली मराठी साहित्य रसिक on ठाणे : ‘बोलीभाषेची फोडणी’
Dr.Satish Shirsath on अणिबाणी
सौ. सुनीता फडणीस on अष्टपैलू सुचिता पाटील
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on माझी जडण घडण : ५४