संसारातील सुखदु:खांचा, सोहळा करावा लागतो,
आत्मानंद मिळण्यासाठी, गुरू लाभावा लागतो,
माझे माझे म्हणून, कतृत्वाचा डंका पिटावा लागतो,
सारे काही तुझे, हे कळण्याला, गुरू भजावा लागतो,
तसे जन्मता मोकळे, येतोच या भुमीवरी,
मृत्यू येता मोकळेच, जातो आम्ही त्याच्या घरी,
मग काहीच नाही आणले, तरी जीव का हा गुंततो,
भार हलका हा कराया, गुरू कळावा लागतो,
शरिर, मन, ह्रदय नी बुद्धी, सार्यांकडेच ती आहे,
मात्र यांची योग्यता, योगीच तो कुणी जाणताहे,
तेच सारे हो असोनी, नरक भोगती जीव का ?
अडचणी समजून घेण्या, गुरू करावा लागतो,
एकदा कळले मला की, तोच आहे सोबती,
भिती, त्रास सर्व जाती, जीवना मिळते गती,
दृढता मनास येते, सुदृढता येते शरिरी,
वासनांचा मोक्ष होण्या, गुरू स्मरावा लागतो..!!!
— रचना : हेमंत भिडे. जळगाव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
छान अर्थपूर्ण कविता-‘गुरू भजावा लागतो’ 👍सगळे लेख वाचनीय