चाहुल लगता थंडीची
मन उधाण होऊन जाते
साजणाच्या आठवणीत
हळूच जाऊन रमते //१//
गुलाबी थंडीत आठवे मज
उबदार गोधडी आजीची
जाणवतो स्पर्श आजही
जशी होती ती मायेची //२//
गुलाबी थंडीचा गारवा
मनाला माझ्या सुखावतो
दाटलेले धुके पाहताना
नयनात साजणाच्या गुंततो //३//
नभी चंद्र अन् चांदण्या
गुलाबी थंडीत उजळल्या
रातराणीच्या सुगंधाने
आसमंतात दरवळल्या //४//
संध्या बहरावी मित्रांसोबत
असावी सोबत चहाभजीची
हास्याचे फवारे उडवत
मजा लुटुया गुलाबी थंडीची //५//

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800
🌹खूप छान, सुंदर कविता. थंडीची ऊबदार मज्जा. त्यात आजी नं चंद्र मस्त गुंपहून घेतला आहे. कवयत्री परवीन जी धन्यवाद 🙏🌹