लाडिक चाळे करत तू आली आमच्या जवळी
गुलाबी गुलाबी म्हणत येत होती अंगाशी
रोमांचित करत अंगात शरारत करत काया
बिलगली अशी तू अहा काय तुझी ही माया
उबदार मिठीत जवळपास येऊ लागली
मऊसूत गादीत चक्क घुसू लागली
गुलाबी म्हटलं तूला तर तू लाजते किती छान
आवाज ही नाही करत तरी तू वाजते किती छान
जवळ येता येता हुडहुडी भरवू लागली
गुलाबी म्हणता म्हणता बोचरी होऊ लागली
बघ हं ही आहे मुंबई
मोह माया, मोह नगरी
इथे पडलीस अडकून
तर आनंदच आहे
भले भले आले इथे
अन कायमचेच राहिले
हातपाय पसरून
सर्वांचेच स्वागत आहे.
प्रत्येक महिन्यात
आणि एप्रिल, मे मध्ये
तर इथे राहूनच दाखव.
अशीच
बिलगत बिलगत
मुंबईला
तुझी सवयच कर.
छान आहे ही थंडी
तू आहे गुलाबी….
गुलाबीच रहा
थंडी थंडी गुलाबी…
तू कोवळीच रहा.

– रचना : पूर्णिमानंद. मुंबई
– संपादन : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800