छत्रपती संभाजीनगर मध्ये रीड अँड लीड फाउंडेशन आणि मरियम मिर्झा मोहल्ला ग्रंथालय चळवळीमुळे एक क्रांती शांतपणे सुरू आहे. ते मुलांना शिकवत आहेत की सर्वात मौल्यवान गुंतवणूक पैश्यात नाही, तर पुस्तकात आहे !
या चळवळीचा केंद्रबिंदू म्हणजे एक प्लास्टिकचा बचत डबा, म्हणजेच ‘गुल्लक’ आहे. रीड अँड लीड फाउंडेशनचे अध्यक्ष मौलाना अब्दुल कय्यूम मिर्झा यांनी सुरू केलेल्या या उपक्रमाने आतापर्यंत 52 शाळांमधील 60,000 हून अधिक विद्यार्थ्यांना जोडल्यामुळे त्यांच्या खिशातली चिल्लर ज्ञानाच्या उत्कट ध्येयात बदलत आहे.
गल्ल्या ची शक्ती :
स्मार्टफोन आणि सोशल मीडियाच्या वर्चस्वाखालील या युगात, मौलाना मिर्झा आणि त्यांची कन्या तथा मोहल्ला ग्रंथालयाची संस्थापिका यांनी दोन समस्या ओळखल्या, त्या म्हणजे कमी कमी होत चालवले वाचन आणि बचतीची सवय. या समस्यांचे उत्तर म्हणून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांमध्ये बचतीची आवड निर्माण होण्यासाठी मोफत ‘गुल्लक’ वाटप करणे सुरू केले आहे.
पुढे या बचतीतून मुलांनी पुस्तके विकत घेऊन वाचणे अपेक्षित आहे.

या उपक्रमाविषयी बोलताना मौलाना मिर्झा म्हणाले, तीन ते पाच रुपये इतकी अल्प किंमत असलेली लहानशी ‘गुल्लक’, या मुलांसाठी वैयक्तिक लहान बँकेसारखी आहे. ते जमा झालेली बचत पुस्तके खरेदी करण्यासाठी खर्च करू शकतील. खेळणी किंवा मिठाईवर पैसे वाया घालवण्यापेक्षा हे चांगले नाही का ?”
हे फाउंडेशन वेळोवेळी शाळेत पुस्तक मेळ्यांचे आयोजन करते. यावेळी उत्साही मुले त्यांच्या बचतीने भरलेले खिसे घेऊन येतात आणि मराठी, इंग्रजी, हिंदी किंवा उर्दू मधील आपली आवडती पुस्तके अभिमानाने विकत घेतात.
मोहल्ला ग्रंथालये आणि पुढील अध्याय :
‘गुल्लक’ पहल मरियम मिर्झा यांच्या मोहल्ला ग्रंथालय चळवळीची एक महत्त्वपूर्ण भागीदार आहे. या चळवळीने गरीब वस्त्यांमध्ये तीन डझनांहून अधिक ग्रंथालये उघडून प्रत्येक मुलाला पुस्तके उपलब्ध होतील याची खात्री केली आहे. कोरोनाच्या लॉकडाऊन दरम्यान स्वतःच्या बाल्कनीमध्ये पहिले ग्रंथालय सुरू करणाऱ्या मरियमने एका जन-आंदोलनाला प्रेरणा दिल्याने पुस्तकांच्या उपलब्धतेला सामुदायिक सहभागाची जोड मिळाली आहे.

या पितापुत्रीच्या सामूहिक प्रयत्नांमुळे मुलांना “मोबाईल, व्हिडिओ-गेम्स, दूरदर्शन किंवा सोशल मीडियापासून दूर राहून ‘पुस्तकांना आपले सर्वात चांगले मित्र’ बनवण्यास” प्रोत्साहन मिळते.
रीड अँड लीड फाउंडेशनमुळे ‘गुल्लक’मध्ये जमा झालेले प्रत्येक नाणे एका नवीन अध्यायाची सुरुवात करते, ही ज्ञानातील अशी गुंतवणूक आहे जी वाढतच जाईल. यामुळे केवळ आर्थिक नव्हे, तर बौद्धिक भविष्यही सुरक्षित होईल. पुढील काही वर्षांत एक लाख ‘गुल्लक’ वितरित करण्याचे फाउंडेशनचे उद्दिष्ट आहे, जेणेकरून वाचन आणि बचतीच्या सवयी पुढील पिढ्यांमध्ये बहरत राहतील.
— टीम एन एस टी. ☎️ 9869484800
