१. पुनर्जन्म घे कान्हा
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी,
करते प्रार्थना कृष्णा तुला
घे जन्म पुन्हा कन्हैया
गरज तुझी माझ्या देशाला
झाले आहेत खूप कंस इथे
लुटतात अन्न धन गरिबांचे
स्वतःला म्हणवतात सेवक
पण करतात राज्य अधिकाराचे
भगिनी अनेक वाट पाहती
वाचवशिल तू चीर त्यांचे
उघडे पाडाया बघू लागला
आजचा समाज शील ज्यांचे
कालिया तर दिसती जागोजागी
मनुष्य रूपे जन्मले जे
भावाशीच करती घात
अशी कृतघ्न माणसे इथे
वाट तुझी पाहती भीष्म
येऊन कर तू धर्मयुद्ध
धर्मभ्रष्ट झाली ही धरती
करशील ना येऊन शुद्ध
म्हणाला होतास ना तू
गरज पडल्यास जन्म घेईन
ये आता लवकर कान्हा
जन्मांची मी ऋणी राहीन

– रचना : सौ. अनला बापट. राजकोट
२. बाळकृष्ण
प्रत्यक्ष ते परब्रह्म नंदाघरी
कृष्णालिला ती न्यारी
सहज पुतना शोषीली
मुखी पाहूनी ब्रम्हांड
यशोदामाता हर्षली
दही दुध लोणी
खातो चोरूनी शिंक्यावरला मटका फोडूनी
गोपिकांचे ह्रदय नेतो चोरूनी
हरीचक्रपाणी हा राधेला भूलवी
दाढी वेणीची गाठ बांधूनी
कधी जाई मुंगुस सोडुनी
गर्दभ बांधून, देई धेनू सोडुनी
गवळणींची पाही फजिती
गोपगड्यांसवे करितो खोड्या
गवळणीं पाहूनी झाल्या वेड्या
यशोदेसी करिती कागाळ्या
तुझा, कृष्ण बाई आहे भूलव्या
गोकुळी अवतरली स्वर्गनगरी
चिंता पळाल्या साऱ्या बाहेरी
अवघे आसूर धाडिले यमाघरी
कालिया मर्दूनी यमुना ढोही
कसांची ती झोप उडविली
बाळकृष्ण नंदाघरी !!!

– रचना : आशा दळवी. दुधेबावी, सातारा
३. साजिरा मुरारी
पावा धरूनी हातात
उभा साजिरा मुरारी
मोरपिसे अंगोपांगी
मुर्ती देखणी गोजिरी ।
भाळी रेखुनी केशर
स्निग्ध लोचनांचा धनी
तान छेडून भैरवीची
सुर मंजुळ येती कानी ।
डोई पगडी रेशमी
त्यावर मोरपंख खोचले
भान हरवती गोपी
नेत्री प्रेमभाव साचले ।
ओठी लावली बासरी
कानी कुंडले डुलती
गळा हार सुवर्णाचा
अंगुलीत मुद्रा शोभती ।
गळ्यातली गळसरी
कशी चालतांना झुले
सोनीयाच्या मेखलेला
शोभा देती कनकफुले |
कटी लेवुनीया मोरपीस
कृष्ण दिसतो मनोहारी
बघताच भान हरे
जगकल्याण जगकैवारी ।

– रचना : सौ सुजाता येवले.
– संपादन : अलका भुजबळ.
सुजाता येवले खुपच छान
अनला ताई, खूप सुंदर कविता!👌👌 आज खरेच पुन्हा कृष्णाची नितांत गरज आहे या पृथ्वीतलावर!👍👍
सुजाता येवले कविता खूप आवडली
Sujata Yeola खुपच छान कविता
Sujata Yeole खुपच छान कविता
Very nice composition
खूप छान सादरीकरण
खूप छान
Wonderful description of the Kanha by the poet in the verses.
Beautiful composition.
Sujata Yeole –
Very nicely composed and use of appropriate words at the right places.
The feeling and emotion has been conveyed very smoothly to all the readers.
Expecting huge response from everybody and also waiting for more content from the poet (Sujata Yeole)
Sujata Yeole खुपच छान