षडाक्षरी काव्य रचना
गोवत्सबारस
दिवाळी आरंभ
नव धान्य येता
नैवैद्यी प्रारंभ
गोमाता पालन
भूतदया धर्म
संतांचे वचन
करा नित्य कर्म
गोमाता वासरू
असे ते लेकरू
सद्भाव मनीचा
न कोणी विसरू
दुग्ध देई तान्ह्या
करीते पोषण
मनोभावे करा
हो कुंकूमार्चन
हरित तृणाने
क्षूधा तृष्णा तृप्ती
गोपालनहार
त्रासातून मुक्ती
गोमांस पातक
वाईट सेवन
गत जन्मी होते
का तुम्ही रावण!
नित्य द्यावा घास
देई आशीर्वाद
परोपकाराचा
शिका आशावाद
चर्म देई जोडे
कुणास आसन
कशासाठी हवे
मांसाचे व्यसन
नाना देव असे
सदा तिच्या ठाया
उंबरठी नाल
पडा तिचा पाया
अष्टपैलू माता
विश्वाची जननी
दुध घृत दही
नित्य घ्या सेवनी
कडधान्य भाजी
सडीचा तो भात
बाजरी भाकरी
खाता मिटे वात
— रचना : सौ शोभा कोठावदे. नवी मुंबई.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800