लहानपणी झोप नाही आली की
आजी गोष्ट सांगायची
एका राक्षसाची..
मला काल
उगीचच आठवली ती गोष्ट
आजीच्या गोष्टीतला राक्षस
हाच तर नसेल ना?
असेल कदाचित
मी माझ्याशीच पुटपुटले..
तोही असाच होता नरभक्षक..
वाड्यावस्त्यातून गुपचूप फिरणारा
अदृश्य…
नजरेने न दिसणारा
त्यांच्या विरूद्ध लढणारे
डॉक्टर्स पोलीस यांच्यावरही
करतोय हल्ला तो
राजाच्या शिपायांवर करायचा तसा
अबाल वृद्ध तर त्याच्या आवडीचे
इतकंच नाही तर
लहान लहान बाळांनाही
सोडत नाही तो…
परत तीच गोष्ट सागत
काल आजी स्वप्नात आली
अन्…
जाता जाता तेवढंच सांगून गेली
पोरी घरातच राहा
बाहेर जाऊ नकोस
राक्षस बाहेर फिरतोय
काळजी घे
रचना : लता गुठे