Wednesday, February 5, 2025
Homeलेखग्लोबल गुरुपौर्णिमा

ग्लोबल गुरुपौर्णिमा

गुरू पौर्णिमा ही गुरू बद्दल आदर व कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साजरी केली जाते. या निमित्ताने “मीटकलाकार” या संस्थेचा ऑनलाईन ग्लोबल गुरुपौर्णिमा उत्सव 23 जुलै 2022 रोजी जरा आगळ्यावेगळ्या स्वरूपात झाला.

ऑनलाइन यासाठी की या संस्थेचे सगळे गुरु आणि शिष्य देश-विदेशातील आहेत. दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या पुढच्या आठवड्यात हा उत्सव साजरा केला जातो. यावेळी तो दोन सत्रांमध्ये साजरा केला.

प्रथम सत्र
या वर्षी प्रमुख अतिथी म्हणून दिल्ली येथील प्रसिद्ध तबलावादक पंडित विनोद लेले उपस्थित होते. त्यांनी गुरुबद्दल चार शब्द सांगितले. मीटकलाकार संस्थेच्या संस्थापक सदस्या ऋचा राज्याध्यक्ष यांनी या गुरुपौर्णिमेच्या उत्सवाची सुरुवात केली. प्रमुख अतिथींचे स्वागत प्रिया मोडक यांनी केले. श्रद्धा जोशी आणि प्राची महाडिक यांनी इतर गुरूंचे स्वागत केले.

कार्यक्रमाची सुरुवात कल्याणचे भरत तेलंग – हिन्दुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे गुरु यांनी केली. तेलंगाकडे वंदन, डॉक्टर प्रमोद हे अमेरिकेतील शिष्य, तर निशांत आणि अंगद हे भारतातील शिष्य शिकत आहेत.

“सुर नवा ध्यास नवा” फेम मधुरा देशपांडे या मराठी आणि हिंदी गाणी म्हणजेच सुगम संगीत शिकवतात. सोनल या अमेरिकेतील तर सोनाली, प्रिता आणि अमृता या भारतातील शिष्या शिकत आहेत. त्या सगळ्यांनी विविध गाणी सादर केली. सोनल बोरस्ते ह्या चार वर्षांपासून मधुरा मॅडम कडे शिकत आहेत. नंतर ऑस्ट्रेलियाच्या साधिका ह्या अकरा वर्षाच्या मुलीचा परफॉर्मन्स झाला. ती पण गेले दोन वर्ष प्रणाली काळे ह्या संगीत शिक्षिकेकडे शिकत आहेत.

मनीषा जोशी ह्या सोलापूरच्या प्रसिद्ध कथक नृत्यांगना, त्यांनी गुरुवंदना सादर केली आणि त्यानंतर त्यांची शिष्या पल्लवी यांनी पण थोडे तोडे-तुकडे सादर केले. श्राव्या यांनी अतिशय सुंदर कथकचा परफॉर्मन्स केला. त्या भारतातीलच असून शर्मिला आंब्रे या कथक गुरूकडे शिकत आहेत. सर्वजीत बेंगलोरहुन गेल्या दोन वर्षापासून हार्मोनियम शिकत आहेत. त्यानी भूप राग सादर केला.

यानंतर गानहिरा दीपा पराडकर साठे यांनी पंडित अजित कडकडे या त्यांच्या गुरुंची ‘मैफिलीचे गीत माझे’ ही अप्रतिम रचना सादर केली. त्यानंतर बॉलीवूड गाणी शिकवणारे राजेश भाटे यांनी जुनी किशोर कुमारची गाणी आणि त्यांचा शिष्य यश यांनी फ्युजन सुंदररित्या सादर केले.

भरतनाट्यमच्या गुरू शशी रमेश यांनी सर्व शिष्यांना मार्गदर्शन केले, त्यांची शिष्या अवंतिका यांचा भरतनाट्यमचा एक सुंदर परफॉर्मन्स झाला. त्यानंतर अनघा देव या मंगळागौरीच्या तसेच लोकनृत्य शिक्षिका आणि एक्ट्रेस आहेत. त्यांनी मीटकलाकार च्या अंतर्गत मंगळागौरीची कार्यशाळा घेतली. तिथल्या लीना मॅडम आणि त्यांचा ‘नथ अंड हिल्स’ नावाच्या ग्रुप ने सुंदर मंगळागौरीचा परफॉर्मन्स दिला.

सुगम संगीत, बॉलीवूड गाणी शिकवणारे अजून एक शिक्षक पारिजात कालेकर यांनी ‘एहसान तेरा होगा मुझ पर’ हे गाणं गाऊन छान परफॉर्मन्स दिला. कार्यक्रमाची सांगता गिटार, कीबोर्ड आणि मेंडोलिन आर्टिस्ट प्रसाद किर्लोस्कर यांनी केली.

दुसरे सत्र
दुसऱ्या सत्राची सुरवात मीटकलाकार मधील सर्वात ज्येष्ठ गुरु आणि इंग्लिश बंदिशींचे बादशाह श्री किरण फाटक यांनी गुरु वरील सुंदर बंदिश गाऊन केली. त्यांनी म्युझिक वरची बरीच पुस्तकं लिहिली असून डिक्शनरी पण तयार केली आहे. चाणक्य हे त्यांचे शिष्य न्यू जर्सीहुन त्यांच्याकडे शिकत आहेत.

त्यानंतर कुचिपुडी डान्सर रेखा सतीश यांनी कुचिपुडी आणि गुरु बद्दल चार शब्द सांगितले. अबोली गद्रे रानडे शास्त्रोक्त संगीतातल्या विशारद आहेत असून सुगम संगीतही शिकवतात त्यांनी सुरेल ‘झुला’ सादर केला.

त्यानंतर समन्वय सरकार कलकत्त्याचे – प्रसिद्ध सितार आर्टिस्ट, त्यांनी गौड मल्हार सादर केला. त्यांच्याकडे 71 वर्षाचे सकारिया लंडनहून शिकत आहेत. या वयात ते शिकत आहेत हे खूप कौतुकास्पद आहे !

स्वराज्य रक्षक संभाजी व स्वराज्य सौदामिनी ताराराणी सिरीयल चे टायटल सॉंग गाणारे, ‘मीटकलाकार’ चे सुगम संगीताचे शिक्षक संदीप उबाळे यांनी उस्ताद राशिद खान यांचे ‘आओगे जब तुम ओ साजना’ हे प्रसिद्ध गाणं सादर केलं.

त्यांच्या पाठोपाठ कौशिक भट्टाचार्य हे कलकत्त्याचे सुप्रसिद्ध शास्त्रोक्त संगीत शिक्षक आणि कलाकार, त्यांनी ‘कजरी’ सादर केली. त्यांची शिष्या अद्रीताने एक भजन आणि यमन राग सादर केला. मिताली या प्रतिभा कुलकर्णी यांच्या शिष्येने केशवा माधवा हे भजन सादर केलं.

पुण्यातील सितार वादक अद्वैत गाडगीळ यांच्याकडे जर्मनीहून अमोल हे गेले पाच वर्ष सतार शिकत आहेत. त्यांनी चारुकेशी हा राग सतारीवर सादर केला. तसेच त्यांचे दुसरे शिष्य कल्याणचे विक्रांत, त्यांनी सतार वादनात आहिर भैरव हा राग सादर केला.

त्यानंतर प्रसिद्ध हिंदुस्तानी शास्त्रोक्त संगीताचे जाणकार, कलाकार आणि शिक्षक पुष्कर लेले यांची शिष्या रामेश्वरी यांनी राग बिहागमधील बंदिश अप्रतिम सादर केली. आणि तेजस्विनी जोशी आंगल यांनी शुद्ध सारंग मधली बंदिश सादर केली.

कार्यक्रमाची सांगता अतिशय एका वेगळ्या वादनाने झाली ती म्हणजे माउथ ऑर्गन जिला हार्मोनीका असेही म्हणतात, नीता दास कुलकर्णी ह्या हार्मोनीका चे ऑनलाईन क्लासेस घेतात हे खरोखर कौतुकास्पद आहे. त्यांच्याकडे लंडनहून डॉक्टर कोपीकर, मुंबईहून केतन आणि दिल्लीहून प्रदीपकुमार शिकत आहेत. प्रदीपकुमार यांनी ‘आचल के तुझे’ हे गाणं हर्मोनिका वर अतिशय सुंदर सादर केले. आणि नीता कुलकर्णी यांनी स्वतः ‘ना तुम हमे जानो’ हे गाणं उत्तमरीत्या सादर करून कार्यक्रमाची सांगता केली.

उज्वला आठवले या मिटकलाकार टीम मधील सर्वात जेष्ठ सदस्य, त्यांनी सगळ्यांचे आभार मानून या सुंदर कार्यक्रमाची सांगता केली.

प्रिया मोडक

– लेखन : प्रिया मोडक
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. मीट कलाकारांचा उत्साह वाखाणण्यासारखा आहे
    अतिशय सुसंगत कार्यक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

प्रांजली प्रकाश दिघे on अब तक छप्पन्न !
सविता दांडेकर on श्री गणेशा
रंजना देशपांडे बी /32 आणि बी/136 on आठवणीतील गव्हरमेंट काॅलनी