Thursday, September 18, 2025

घर

चार भिंतींनी सजले
घर सुंदर स्वप्नांचे
सुख शांती समाधान
सूर जुळावे सर्वांचे //१//

सुगंधित रातराणी
अंगणात बहरावी
मोगऱ्याच्या वेलीवर
कळी उमलून जावी//२//

आई बाबा असावेत
पाया भक्कम घराचे
करा आदर सन्मान
मन जपावे दोघांचे//३//

घरातील सर्वांमध्ये
झरा वाहत रहावा
आपुलकी विश्वासाचा
जपू नात्यांचा ओलावा//४//

नात्यांच्याच बंधनात
राहू विश्वास प्रेमाने
देऊ साथ एकमेका
धागा जोडून मनाने//५//

नांदणार आपुलकी
जेव्हा बळ असणार
एकी प्रेम विश्वासाचे
घर तेव्हा सजणार//६//

राहू सारे आनंदाने
नको कधी भांडायाचे
तेव्हा होईल सुंदर
घर आपले स्वप्नांचे //७//

परवीन कौसर

– रचना : परवीन कौसर. बेंगलोर
–  संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

2 COMMENTS

  1. स्वप्नांचे सुंदर घर. ही कल्पनाच सुंदर
    कविता सुरेख.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

विजय लोखंडे on हलकं फुलकं
श्रीकांत जोशी on प्रधान सेवक
अजित महाडकर, ठाणे on पुस्तक परिचय
Manisha Shekhar Tamhane on झेप : ३
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on हलकं फुलकं
Balasaheb Thorat on हलकं फुलकं
Nagesh Shewalkar on हलकं फुलकं
सुनील कुळकर्णी on झेप : ३
Vishakha Sane on झेप : ३
अजित महाडकर, ठाणे on झेप : ३
Adv.Bharati Nale on आमचे अण्णा