आयुष्याची घसरगुंडी
भल्याभल्यांची घाबरगुंडी
आजवर होता कणा ताठ
आता कायम बिछान्याला पाठ
प्रत्येक सणाला
पुरण पोळ्या
आता रोज सण
साजरा करतात गोळ्या
नटले, सजले,
वस्त्रालंकार
घालून मिरवले
आता आरशाला दूर लोटले
खेळलो क्रिकेट,
मारल्या किती सिक्सर
आता पाऊल टाकायला
लागतो वॉकर
तीन तीन तास
गाजवल्या सभा
आता राहू शकत
नाही उभा
जन्मभर घातले
सूट, टाय, शर्ट
आता घालतो बंडी
पण लागत नाही गुंडी
आवडीने खाल्ला
मटण, पाव, मस्का
आता सारखा
लागतो ठसका
आयुष्याचे वाळवंट
लेक येते भेटायला
घेऊन येते आनंद,
ठेवून जाते सुगंध.

— रचना : सुलभा गुप्ते. पुणे
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : सौ अलका भुजबळ. ☎️ 9869484800
👌👌👌👌 छान आहे कविता