सावंतवाडीच्या कुशीत
माझा घाट अंबोलीचा
वर जाता आजऱ्याला
रस्ता काटेरी वेलींचा।।
झाडे चुंबती आकाश ।
ढग कडा आलींगले
गर्ददरी झुडपात
गवताचे ताडगोळे।।
ञुतू मृगाचा वर्षता
आगमन झंजावाती
कडी कपारी नादते
मोठ्या वेगाने धूमती।।
आनंदाने पाना फुला
नवी फुटते पालवी
गंध घेऊनी मृगाचा
वारा डाहाळी हालवी।।
गोल घूमट घाटात
रान हिरवे हिरवे
साऱ्या घाटात ऊडती
रंग लेऊनी पारवे।।
गर्द नभाची चादर
दरी नेसुनिया येई
गाडी लाजत लाजत
दाट धूक्यातुन जाई।।
घाट संपता संपता
दरी किती खोल वाटे
खोल दरीच्या तळाशी
मन रेलून राहते।।
दर वरसाला माता
नदी भेटते बापाला
घाट बिचारा हा बाप
लेकी साठी आतूरला ।।

– रचना : मकरंद वांगणेकर. कल्याण
घाट आंबोलीचा अतिशय सुंदर कविता लिहीली आहे वाचताना प्रत्यक्ष घाटात अनुभव घेत आहोत असं चित्र नजरेसमोर उभ राहिल 👌👌👍👍💐💐