माझ्या “चंद्रकला” कादंबरीचा प्रकाशन सोहळा यवतमाळ येथील “केमिस्ट भवनाच्या सभागृहात नुकताच अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडला.
सदर कार्यक्रम जेष्ठ पत्रकार तथा प्रा न.मा. जोशी सर यांच्या अध्यक्षतेखाली आणि राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ.टी.सी.राठोड, प्राचार्य रमाकांत कोलते, श्री हरिसिंग साबळे, श्री रणजीत चंदेल (निवृत्त जिल्हा माहिती अधिकारी) आणि खुदबखूर सौ. चंद्रकला निंबाजीराव भगत दांपत्य यांच्या उपस्थितीत संपन्न झाला.
“चंद्रकला” ही कादंबरी एका धेय्यवेड्या शिक्षिकेच्या जीवनाची संघर्ष गाथा असून सामाजिक व शैक्षणिक विचारांच्या आधारवर ती लिहिलेली आहे. त्यासाठी समाजातील अनेक मान्यवरांनी प्रतिक्रिया तसेच शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत. त्यामध्ये सन्माननीय श्री ज. स. सहारिया साहेब (निवृत्त मुख्य सचिव) श्री संजय चहांदे साहेब (निवृत्त अतिरिक्त मुख्य सचिव) ॲड दिलीप भाऊ एडतकर, श्री बी.के. नाईक (निवृत्त जिल्हाधिकारी), न्यूज स्टोरी टुडे वेब पोर्टलचे संपादक श्री देवेंद्र भुजबळ साहेब, सौ. अलका भुजबळ, श्री अशोक खरात जी की, ज्यांनी हे पुस्तक दर्जेदार व्हावे म्हणून मेहनत घेतली आहे. याशिवाय प्रा डॉ भाऊ दायदार, श्री शरद बरडे (पोलिस उप अधीक्षक (सेवानिवृत्त) आणि माझे सदासर्वकाळ मित्र परिवारातील श्री प्रदीप गोसावी, वैजनाथ लटके आणि राजेंद्र पवार या सर्वांच्या सदिच्छेने व शुभेच्छेने हा कार्यक्रम अतिशय थाटात पार पडला.
या प्रसंगी उपस्थित सर्वच मान्यवरांनी “चंद्रकला” या सामाजिक व शैक्षणिक विचारांच्या कादंबरीच्या प्रेमातच पडलो असल्याची भावना व्यक्त केल्या आणि लेखकाने भविष्यात चांगले व कसदार साहित्य लिखाणासाठी शुभेच्छा दिल्या.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा संजय चव्हाण यांनी केले तर सर्व उपस्थित मान्यवरांचे आभार प्रदर्शन प्रतीक जाधव यांनी केल्यावर कार्यक्रमाची सांगता झाली.
— लेखन : राजाराम जाधव
— संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800