महाराष्ट्र शासनाचे निवृत्त सह सचिव श्री राजाराम जाधव लिखित व न्युज स्टोरी टुडे प्रकाशित “चंद्रकला” या कादंबरीचा प्रकाशन साेहळा यवतमाळ येथील, केमिस्ट भवनमध्ये राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री श्री संजय राठाेड यांचे विशेष उपस्थितीत नुकताच संपन्न झाला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक, प्रा. श्री न.मा.जाेशी सर तसेच विशेष अतिथी म्हणुन डाँ.टी.सी राठाेड, प्राचार्य रमाकांतजी काेलते, श्री हरिसिंगजी साबळे माजी DIG, ज्यांच्यावर कादंबरी लिहिली त्या सौ चंद्रकलाबाई निंबाजीराव भगत, श्री निंबाजीराव हे दांपत्य व लेखक श्री राजाराम जाधव हे विचारमंचावर हाेते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक श्री राजारामजी जाधव यांनी करतांना “चंद्रकला” कादंबरीच्या लिखाणाबद्दलची पार्श्वभूमी विषद केली.
आपले मनोगत व्यक्त करताना, सौ. चंद्रकला भगत यांनी तिच्या जीवनातील वास्तव मांडले.
मंत्री श्री संजय राठोड यांनी लेखक राजाराम जाधव यांच्या सामाजिक विचारधारा आणि त्यांच्या “चंद्रकला” कादंबरी शिवाय इतर साहित्य लिखाणाचे कौतुक करून पुढील सामाजिक लिखाणाला शुभेच्छा दिल्या.
विशेष अतिथी डॉ. टी. राठोड यांनीही “चंद्रकला” कादंबरीच्या लिखाणाबद्दल, त्यातील ओघवत्या भाषेचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषण करताना प्रा न.मा. जोशी यांनी केवळ लेखक राजाराम जाधव यांच्या सामाजिक लिखाणाचे कौतुकच केले नाही, तर जाधव यांच्या विद्यार्थी दशेपासून आजतागायत शासनाचे एक वरिष्ठ अधिकारी म्हणून जी कारकीर्द यशस्वीपणे पार पडली, त्याचा लेखाजोखा मांडला आणि “चंद्रकला” कादंबरी संदर्भात अतिशय समर्पकपणे मांडणी केली, लेखकाला पुढील लिखाणासाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
याशिवाय प्राचार्य रमाकांत कोलते, श्री हरिसिंग साबळे यांनी “चंद्रकला” कादंबरी लिखाणाबद्दल लेखकाची प्रशंसा केली.
सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा.श्री संजय एस.चव्हाण पुसद तर आभार प्रदर्शन श्री प्रतीक जाधव यांनी केले.
यावेळी श्री राजाराम जाधव यांचे मित्र परिवारातील नवलकिशोर राठोड, धुपचंद राठोड, हिरासिंग राठोड, प्राचार्य शांताराम चव्हाण, प्राचार्य तोताराम जी राठोड, दयाराम जी राठोड, गोवर्धन राठोड, प्रकाश जाधव, ॲड जगदीश पवार आणि इतर अनेक चाहते सहपरिवार हाेते.
— टीम एनएसटी. ☎️ 9869484800