जर तुम्ही एखाद्या पर्यटन स्थळाला भेट देण्याचे ठरवीत असाल तर, थंड हवेचे ठिकाण असलेल्या माळशेज घाटला नक्की भेट द्या. वीकेंडला म्हणजेच आठवड्यातच्या शेवटी शनिवार-रविवार दोन सुट्ट्या लागोपाठ आल्या की पर्यटक लगेच पर्यटन स्थळी जातात. हा बदल धकाधुकीच्या रोजच्या जीवनात काहीतरी वेगळेपण देतो. त्यासाठी मुंबई पुण्यापासून जवळ असल्यामुळे माळशेज हा उत्तम पर्याय आहे.
मुंबईपासून माळशेज घाट कल्याण_ मुरबाड मार्गे १२७ किलो मिटर अंतरावर आहे. तर पुण्याहून नारायणगाव जुन्नर मार्गे १२० किलोमीटर अंतरावर आहे. हा परिसर अत्यंत अल्हाददायक आहे.
पश्चिम घाटातील सर्वाधिक डोंगररांगा असलेले स्थळ म्हणजे माळशेज घाट. माळशेज घाट हा मुख्य रस्त्यावर असल्याने कल्याणहुन अनेक एसटी ये जा करत असतात. उत्तुंग डोंगररांगा, हिरवी झाडे, विपुल वनराई, खोल दऱ्या, धुके, उंचावरून कोसळणारे शुभ्र दुधासारखे धबधबे, जलाशय या साऱ्यांमुळे मनाला आनंद मिळतो.
पावसाळ्यात धुक्याची चादर पांघरलेला डोंगराचा परिसर, जणू आपल्या रस्ता आडवत असल्याचे भासते. साधे चारचाकी वाहन चालवताना जणू पुष्पक विमानाने ढगांची सैर करतो असे भासते. प्रसन्न अशा वातावरणात प्रकृतीचे सानिध्य प्राप्त होते व मन निसर्गात रमून जाते.
माळशेज घाटाच्या बाजूस हरिश्चंद्र गडाची उत्तुंग डोंगर रांग पसरलेली आहे. येथील वनराई जैवविविधतेने नटलेली आहे. अनेक वनस्पती व वन्य प्राणी येथे आढळतात. येथील पक्ष्यांमधील खासियत म्हणजे स्थलांतर करणारे पक्षी येथे आढळतात. त्यामधील प्रामुख्यानं रोहित पक्षी म्हणजेच साइबेरियाई पक्षी “फ्लेमिंगो” तसेच मोहन, अल्पाइन स्विफ्ट, ग्रीन पिजन, पॅरेट देखिल आढळतात.
जर तुम्ही माळशेज घाटात फिरायला जाणार असाल तर काळू धबधब्याला अवश्य भेट द्या. तो तीनशे मीटर उंच उंचावरून सहा टप्प्यात कोसळतो. माळशेज घाटाच्या आसपासची पर्यटन स्थळे म्हणजे आजोबा टेकडीचा किल्ला, वाल्मीक ऋषी मुनी आश्रम, काळू धबधबा, कोकुम कारा, पिंपळगाव जोगा धरण, पुष्पावती नदी, हरिश्चंद्र किल्ला जवळील विष्णू मंदिर, बुद्ध गुफा, शिवनेरी किल्ला, अष्टविनायकातील लेण्याद्रीचा गणपती, ओझरचा गणपती हे देखील पाहण्यासारखे आहेत.
माळशेज घाटाचे वैशिष्ट्य म्हणजे माळशेज घाटाला तुम्ही कधीही भेट देऊ शकता. उन्हाळ्यात विपुल प्रमाणात झाडे, वनराई असल्याने उन्हाची झळ लागत नाही. तर हिवाळ्यात सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यात थंडीत थंड शुद्ध हवा, गारवा यां साऱ्यात प्रकृतीचा आनंद लुटता येतो. पावसाळ्यात जणू येथील वातावरण आल्हाददायक असते. झाडे-झुडपे वर्षा ऋतुमुळे आनंदात डोलताना दिसू लागतात.
अशा या माळशेज घाटाला एकदा तरी नक्की भेट द्या.
– लेखन: वर्षा वासुदेव भावसार
– संपादन: देवेंद्र भुजबळ. 9869484800.
Madam dhanyavad surek mahiti dili.
मॅडम तुमचाच मुळे अष्टविनायकातील गणपतीचे दर्शन जाहले. तुम्ही तुमच्या आर्टिकल मध्ये बारकाईने आजूबाजूचे स्ताना बद्दल माहिती देतात.म्हणून मला तुमचं आर्टिकल विशेष आवडत . आर्टिकल मुळे दोन गणपतीला जाऊन आलो.मॅडम तुम्ही खूप छान लिहितात तुमच्या पुढच्या आर्टिकल ची मी आतुरतेने वाट पाहत असतो. Thank you madam aabhar
Madam khup chahan mahiti dili aamcha saglyana धन्यवाद.
Madam khup chahan mahiti dili tya baddal aabhar.