ओरिगामी ही एक प्राचीन कला आहे. या कलेचा जन्म चीन मध्ये जरी झाला असला तरी तिची वाढ जपान मध्ये झाली आहे. त्या मुळे ती जपानी कला म्हणूनच ओळखली जाते.
ओरि म्हणजे घड्या घालणे आणि गामी म्हणजे कागद. म्हणजेच कागदाच्या विविध आकाराच्या कलात्मक घड्या घालून त्यातून विविध आकृत्या निर्माण केल्या जातात. अशी ही कला बालकांपासून वृद्धांपर्यंत सर्वानाच आनंद देणारी आहे.
अशा या सुंदर ओरिगामी कलेचे प्रदर्शन व कार्यशाळा याचे आयोजन ठाणे येथे मधु हळदणकर सभागृहात दिनांक ९ डिसेंबर शुक्रवार संध्याकाळी ५.३० ते ८.००, दिनांक १० व ११ डिसेंबर, शनिवार व रविवार सकाळी १०.०० ते संध्याकाळी ८ .०० या वेळेत करण्यात आले आहे.
हा उपक्रम ओरिगामी ठाणे ट्रस्ट यांनी आयोजित केला असून हे या उपक्रमाचे सातवे वर्ष आहे.
कागदी घड्याघालून बनवलेल्या विविध प्रतिकृती हे प्रदर्शनाचे विशेष आकर्षण तर आहेच त्याचबरोबर आवड असणा-या प्रत्येकाला कार्यशाळेचा लाभ घेता येणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटन श्री.शैलेश साळवी , बी.एफ.ए, जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्स हे करणार आहेत.
कार्यशाळेसाठी संपर्क क्रमांक-
श्री.जयंत कयाळ- ९९२०३९६३२६
सौ.रसिका बेडेकर –८८५०५३८८३६

– लेखन : चैताली कानिटकर
– संपादन : देवेंद्र भुजबळ. ☎️9869484800
