केरळ : उद्योग, व्यवसाय
नमस्कार, वाचक हो.
आजच्या भागात आपण केरळमधील उद्योग व्यवसाय या विषयी माहिती घेणार आहोत.
केरळ हे मुख्यत्वेकरून पर्यटनासाठी ओळखले जाते.
निसर्ग सौन्दर्यामुळे केरळ मध्ये पर्यटन व्यवसाय छानपैकी चालतो. देशा बरोबर परदेशी पर्यटकही मोठया संख्येने आकृष्ट होतात.
केरळचा मुख्य व्यवसाय शेती आहे. भात, नारळ, काजू, केळी अशी ठराविक पिके घेतली जातात. पण मसाल्यांच्या उत्पादनासाठीही केरळ ओळखला जातो.
भौगोलिक वातावरण मसाल्यांच्या उत्पन्नासाठी फायदेशीर ठरते. डोंगर उतारांवर चहा, कॉफी, वेलदोडे, मिरी यांच्या बरोबर, रबरचे मळे असतात त्याच्यापासून उत्पन्न घेतले जाते.
चहाचे मळे थंड हवामानात डोंगर उतारावर लावले जातात. चहाची नाजूक पाने खुडून सुकवली जातात नंतर त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. पानांच्या चुऱ्यावर चहाची किंमत ठरते.
नारळाच्या काथ्या पासून बनणाऱ्या वस्तू हस्तकौशल्य पारंपारिक व्यवसाय केले जातात. कॉयर उत्पादनावर आधारित विविध हस्तकला उद्योग केले जातात. खाद्य तेल उत्पादन एक महत्वाचा उद्योग आहे.
भारत सरकार द्वारा स्थापित कॉयर मंडळाला २०१३ मध्ये ६० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारत सरकारने ‘कॉयर बोर्ड के 60 वर्ष ‘ असे १० रुपयाचे नाणेही व्यवहारात आणले होते.
केरळ मध्ये मत्स्य व्यवसायही जोरात चालतो. स्थानिक बाजारात आणि बाहेरही मासळीला मोठी मागणी असते.
केरळमध्ये अवजड उद्योग प्रकार इतर राज्यांच्या तुलनेत अगदी ना च्या बरोबर आहेत.
केरळमधील बहुतांशी लोक नोकरी, व्यवसाय निमित्ताने परदेशात आहेत. त्यांच्याकडून केरळमध्ये मोठ्या प्रमाणात पैसे पाठवले जातात. केरळ सधन असण्याचे ते एक महत्त्वाचे कारण आहे.
– लेखन : सौ. मनिषा दिपक पाटील, पालकाड, केरळ
– संपादन : देवेंद्र भुजबळ, 9869484800
केरळ नवीन माहिती मिळाली
लेखन छान