Monday, October 20, 2025
Homeकलाचला,'लावणी' बघायला !

चला,’लावणी’ बघायला !

‘तमाशा या लोककलेचा सर्वस्पर्शी आलोक साक्षात उभा करणाऱ्या’ तसंच त्यासोबतच ‘कला आणि जगणं यातला विरोधात्मक शोषण-भाव व्यक्त करणाऱ्या’ आंतरराष्ट्रीय कीर्तीचे छायाचित्रकार पद्मश्री सुधारक ओलवे यांच्या ‘लावणी’ या छायाचित्रांचं प्रदर्शन सध्या सुरू असून ते आपण १८ फेब्रुवारी २०२३ पर्यंत पाहू शकता.

मुंबईतील भायखळा येथील ‘नाइन फिश आर्ट गॅलरी’ येथे सकाळी साडेदहा ते संध्याकाळी साडेसात अशी या प्रदर्शनाची वेळ आहे. अभिनेत्री विद्या बालन यांनी या प्रदर्शनाचे उद्घाटन केले आहे.
प्रदर्शनासाठी छायाचित्रांची निवड आणि मांडणी गौरमुनी दास यांनी केली आहे.

महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा अविभाज्य घटक असलेल्या ‘लावणी’नं आपल्या शृंगारिक अदांनी शतकानुशतकं कितीएक मनांना रिझवलं आहे. लावणीची संवादात्मक, थेट भाषा, कधी आव्हानात्मक, हजरजबाबी, तर क्वचितप्रसंगी सामाजिक-राजकीय विडंबनात्मकही होते.

समोरच्या रसिक प्रेक्षकांची अपेक्षा आणि फर्माईश पुरी करण्यात लावणी नर्तिका कसर राहू देत नाहीत. मग लावणी नर्तिकांच्या अदांमधून, विभ्रमांमधून, देहबोलीतून उत्कटपणे सादर होतो तो शृंगारभाव अवघ्या महाराष्ट्राला चिरपरिचित आहे.

पण सुधारक ओलवेंचा कॅमेरा या शृंगारिक अदा टिपण्यात रमत नाही.
या अदांमागची मजबुरी, वेदना त्यांच्या छायाचित्रांमध्ये उतरते, ही त्यांच्या छायाचित्रांची ताकद आहे. लोककलेचं जोखड पिढ्या दरपिढ्या वाहणाऱ्या, जातिव्यवस्थेत पायदळी असलेल्या या समुहांचा जगण्याचा आणि तगण्याचा आटापिटा ही छायाचित्रं आपल्यापर्यंत पोहोचवतात.

अल्प परिचय
सुधारक ओलवे, हे मुंबईस्थित डॉक्युमेंटरी फोटोग्राफर आहेत. भारतीय छायाचित्रकलेच्या क्षेत्रात ते स्वत:चं एक वेगळं अवकाश निर्माण करू पाहात आहेत. त्यांची छायाचित्रं राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमधून प्रसिद्ध झाली असून माल्मो (स्वीडन), लिस्बन, ॲमस्टरडॅम, लॉस एंजेलिस, वॉशिंग्टन, ढाका, मुंबई आणि दिल्ली आदी शहरांमध्ये त्यांची छायाचित्रं यापूर्वी प्रदर्शित झाली आहेत.

शहरी आणि ग्रामीण समुदायांमध्ये कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांसोबत त्यांनी आजवर काम केलं आहे. जगण्याची असोशी, निडरता आणि स्थित्यंतर यांची कहाणी त्यांची छायाचित्रं सांगतात.

२००५ साली नॅशनल जिऑग्रॅफिकच्या ‘ऑल रोड्‌स फोटोग्राफी प्रोग्रॅम’करिता निवड झालेल्या चौघांमध्ये ओलवे यांचा समावेश होता. २०१६ मध्ये भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने त्यांना सन्मानित केलं आहे.

या छायाचित्र प्रदर्शनाला भेट द्यायला आपल्याला नक्कीच आवडेल.

देवेंद्र भुजबळ

– लेखन : देवेंद्र भुजबळ. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments

ॲड.श्रध्दा बापूसाईनाथ राऊळ. आरवली.. on माणसांच्या गर्दीतूनी या…!!
संदीप सुरेंद्र भुजबळ on नगर अभियंत्याचा अभंग
Dattatray Babu Satam on झेप: ६
Madhavi Sule on झेप: ६
उपेंद्र कुलकर्णी on निसर्ग  कोप
Rushikesh Canada on निसर्ग  कोप
Upendra Kulkarni on निसर्ग  कोप
शिवानी गोंडाळ,मेकअप आर्टिस्ट, दूरदर्शन on नवरात्र : नववे रुप
Mohana Karkhanis on निसर्ग  कोप