Tuesday, June 17, 2025
Homeलेखचला, व्यसनाला बदनाम करूया !

चला, व्यसनाला बदनाम करूया !

गेल्या काही वर्षांमध्ये ३१ डिसेंबरला सेलीब्रेशनच्या नावाखाली, खास करून तरुण पिढी मध्ये मोठ्या प्रमाणात व्यसन वाढताना दिसत आहे. अनेक तरुण-तरुणी ३१ डिसेंबरला व्यसनाचा पहिला अनुभव घेतात आणि पुढे जावून व्यसनाच्या आहारी जातात.

या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या कल्पक नेतृत्वातून साकारलेली ‘चला व्यसनाला बदनाम करूया’ ही व्यसन विरोधी मोहीम दरवर्षी राबवत असते. ह्या मोहिमे अंतर्गत १५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०२२ ह्या कालावधीमध्ये व्यसनविरोधी पंधरवडा राबवणार आहे.

सध्या समाजात व्यसनाचे उद्दात्तीकरण होताना दिसते आहे. या मुळे तरुण मुले व्यसनाच्या आहारी जाण्याचे प्रमाण वाढताना दिसत आहे.

ख्रिसमस आणि ३१ डिसेंबर साजरे करताना सर्वत्र फटाक्याचा वापर भरपूर होतो. त्यामुळे ध्वनी प्रदूषण, वायू प्रदूषण, बालमजुरीला प्रोत्साहन, लाखो रुपयांचा चुराडा, अपघात, पर्यावरणाचा ऱ्हास या सारखे दुष्परिणाम होतात. त्यामुळे या वर्षीचा ख्रिसमस आणि ३१ डिसेंबरला प्रदूषणकारी फटाके न फोडता, एकमेकांना भेटवस्तू, मिठाई देवून निरोगी व आनंदाने सण साजरे करा असे आवाहन या अभियानाद्वारे महाराष्ट्र अंनिस तर्फे करण्यात येणार आहे.

व्यसनाच्या दुष्परिणाम बाबत ऑनलाईन/ऑफलाईन व्याख्यानाचे आयोजन करणे, या पंधरवाड्या अंतर्गत सोशल मिडियावर व्यसन विरोधी पोस्टर्स प्रसारित करणे, या पंधरवड्यात फटाक्याच्या दुष्परिणामाची पत्रके वाटणे आणि ऑनलाईन व्याख्याने या द्वारे प्रबोधन करणे या सारखे उपक्रम समितीच्या शाखानी राबवावेत, असे समितीचे आवाहन आहे.

३१ डिसेंबरला ‘दारू नको दूध प्या, फटाके नको भेटवस्तू द्या’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करून या कार्यक्रमांमध्ये नागरिकांना दारूचे दुष्परिणाम सांगून दारू ऐवजी शरीराला हितकारक दूध पिण्याचे ही आवाहन, विविध उपक्रम विभाग, महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने केले आहे.

– टीम एनएसटी. ☎️ 9869484800

RELATED ARTICLES

1 COMMENT

  1. लेखातून केलेले आवाहन योग्यच आहे. व्यसनांना बदनाम करूया म्हणजे एक शीव धनुष्य आव्हान आहे. पण सततचे प्रयत्न लागणार. माझी सदिच्छा 👍

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -

Recent Comments