आपल्या आवडत्या, मला तरी अमृत तुल्य असणाऱ्या “चहा”वर आपण काल आपल्यासाठी नवोदित कवयित्री रोहिणी पराडकर यांची छान कविता वाचली. ही कविता वाचून जेष्ठ कवयित्री अरुणा दुद्दलवार यांनी त्यांच्या चहा वर केलेल्या तब्बल तीन कविता पाठविल्या आहेत. यावरून त्या किती जाज्वल्य चहा प्रेमी आहेत, हे दिसून येते. त्यांच्या या चहा प्रेमाला दाद म्हणून आज त्यांच्या तीनही कविता (शक्य असल्यास चहा घेत☺️) वाचू या.
– संपादक
१. हरदिन चहा
उठताच चहा
विरंगुळा चहा
पेपर वाचताना
हवाच चहा !!
आनंदात चहा
थकल्यावर चहा
पिल्यावर येतो
उत्साह नवा !!
गरमागरम चहा
अमृतच पहा
काळा तो घ्या
किंवा दुधाचा प्या !!
समाधान चहा
चिंता घालवी चहा
चहाचं महत्व
हरदिनी पहा !!
☕☕☕☕☕☕☕
२. मैत्रीचा चहा
किती मधुर
मैत्रीचा असतो चहा
घेऊन पहा
कधीतरी…
चहासोबत नित्य
गप्पा गोष्टी आनंदात
विविध विषयात
चर्चा….
मने जुळण्यास
चहाचे हवे निमित्त
रमते चित्त
गोष्टीत…
गार हवेत
चहाचा घोट वाफाळता
आनंद घेता
निसर्गाचा….
चहाच्या कपात
सुखदुःख जाते मिसळून
शब्दात सांगून
मोकळे…..
मैत्रीचा चहा
घ्यायचा एकत्र जमून
प्रेमाचे सजवून
अंगण…।।
🤝☕☕☕☕☕🤝
३. जोडी चहा खारीची
तुझी माझी
जोडी चहा खारी
भलतीच भारी
मैत्री…..
शाळेत जायचं
दोघी धरून हात
खाऊ दप्तरात
भरून….
हितगुज मनातले
तुलाच मी सांगायची
आणि हसायची
खुदू खुदू…..
कधीतरी कट्टी
दिवसभर नसे करमत
डोळे पुसत
घरीच…..
भेटताच पक्की
सगळं विसरून जायचो
आनंदात न्हायचो
मैत्रीच्या….
शिक्षण संपताच
सासरी ग निघालो
प्रपंचात बुडालो
आपापल्या….
आताही येते
आंबट गोड आठवण
मैत्रीची साठवण
अंतरात…..
कित्येक वर्षांनी
व्हाँटसपवर आपण भेटलो
बोलबोल बोललो
मनातलं …..
मैत्रीच्या फुलांनी
अशीच भरावी ओंजळ
मन प्रांजळ
गंधित…..।।
— रचना : अरुणा दुद्दलवार.
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्मिती: अलका भुजबळ. ☎️ 9869484800
अरुणा ताई, माझ्या एका साहित्यिक समूहातील मैत्रीण असल्याने मी त्यांच्या प्रत्येक रचनेला तेथे दाद देत असतेच, पण आपल्याच माणसांना बाहेर फुलताना, बहरताना पाहण्यात जो आनंद आहे, तो इथेच, ह्याच पोर्टलवर मिळतो. म्हणूनच “चहा” पीत पीत नाही (कारण तो मी कधीच पीत नाही ) ,पण त्यांच्या ‘चहा’ वरच्या काव्य रचना वाचताना अतिशय आनंद झाला. “हरदिन चहा” , “मैत्रीचा चहा” आणि “जोडी चहा-खारीची” सर्वच लाजवाब! अरुणाताई, तुमचे मनःपूर्वक अभिनंदन 🙏💐
अरुणाताईंच्या रचना मला मनापासून आवडतात कारण त्या पटकन समजतात आणि आपण त्याला रिलेट करू शकतो🌷