सकाळी उठल्या उठल्या आपल्याला चहा लागतोच. तर या चहा वर कोल्हापूर येथील सौ.रोहिणी पराडकर यांनी छान कविता केलीय. त्या भारतीय कोल्हापूर मंच ,अखिल मराठी प्रतिष्ठानच्या जिल्हा अध्यक्ष तर कल्पदिप समूहाच्या उपाध्यक्ष
आहे. त्या२०२१ पासून कविता करीत आहेत. त्यांचे न्यूज स्टोरी टुडे परिवारात मनःपूर्वक स्वागत आहे.
– संपादक
सकाळचा वाफाळता
हातात चहा जरी
आलं वेलची चहा
संगे पावसाच्या सरी
तुझी माझी प्रीत सख्या
जशी चहा बरोबर खारी
फक्कड मसालेदार चहा
तजोताजगी भरते सारी
साखर गुळाची अवीट गोडी
चहा संग बिस्किटे मारी
लहान थोरांना आवडतात
वाढवी रंगत चहाची भारी
चहा म्हणजे नवी ताजगी
प्राःतकाळी वाह ताज
पावसात उबदार वाटे
चहाचा घोटात माज
प्रत्येक शहर बोलीभाषा
वेगळी जरी चहाचा खरा
पाहुणचार वेळोवेळी
हवा चहा नाश्ता जरा
चहाची पार्टी रंगतदार
क्षण गोड बातमीचा
चिंताग्रस्त मनास स्फुर्ती
मिळे सुखद आनंदाचा
आळस झटक थकवा घालव
असा फक्कड कडक चहा
आयुर्वेदात महत्त्वाचा
गुणकारी गुळाचा पिऊन पहा
चहा ला नाही वेळेचे बंधन
वेळेला मात्र चहाची संगत
चहा बिस्किटे हवीत सोबत
गरमागरम भजीची पंगत
— रचना : सौ.रोहिणी पराडकर. कोल्हापूर
— संपादन : देवेंद्र भुजबळ.
— निर्माती : अलका भुजबळ. ☎️ 9869484800
छान,👌 चहा टाईम ला चहा ची कविता वाचली, चहाची लज्जत आणखीनच वाढली ☕